बारामतीच्या सूर्यनगरीत आतले आणि बाहेरचे भाजी विक्रेते वाद चिघळला! रहिवाशांनी सांगितलं इथं मंडईच नको! गुरुवारी मंडई बंद ठेवली!
(एम के न्यूज प्रतिनिधी)
बारामतीच्या सूर्यनगरीत गुरुवारी भाजी मंडई
बंद झाली आणि सगळीकडे चर्चा झाली. या
भाजी मंडईत आतले आणि बाहेरचे असा वाद
चिघळला आणि रहिवाशांनी नगरपालिकेकडे
तक्रार केली. मैदानावरची भाजी मंडई
रस्त्यावरही येऊ लागल्याने अरुंद रस्त्यामुळे
व गर्दीमुळे येणे जाणे ही रखडले, त्यामुळे
आम्हाला इथे मंडईच नको! मंडई दुसरीकडे
हलवा. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचे म्हणणे
वेगळेच आहे. केवळ
शेतकऱ्यांना
हटवण्यासाठी
व मोक्याच्या जागा
मिळवण्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी लॉबिंग
केले आहे, शेतकऱ्यांचे वर्चस्व कमी
करण्यासाठी व आपली मक्तेदारी कायम
ठेवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे…
बारामती जशी जशी वाढते आहे, तसे
वेगवेगळे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत.
बारामती शहरातील गणेश भाजी मंडई नंतर
बारामतीतील सूर्यनगरीमध्े काही वर्षापूर्वी
भाजी मंडई सुरू झाली. हळूहळू ही भाजी
मंडई वाढत गेली. विक्रेते येत गेले,
उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन असल्याच्या
कारणाने विक्रेत्यांची संख्या वाढत गेली
जागा कमी होत गेली. त्यातच बाहेरून
येणान्या शेतकऱ्यांना जागा मिळेना. हे
शेतकरी जागा मिळेल तिथे भाजी विकू
लागले शेतकऱ्यांबरोबर बाहेरचे विक्रेते
देखील येऊ लागले आणि हळूहळू येथील
मंडईवर ताण येत गेला. गुरुवारी आणि
रविवारी इथे स्थानिकांना सुद्धा येण्या
जाण्यास रस्ता नसतो. परिणाम असा झाला
की, काल गुरुवारीही मंडई भाजी
विक्रेत्यांच्या संघटनेने बंद ठेवली….
विक्रेते काय म्हणाले?
सूर्यनगरीतील भाजी मंडई विक्री करणाया
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार
येथील रस्त्यावर भाजी विक्रेते भाजी विकत
असल्याने रस्ता अपुरा पडतो. गर्दी मोठी
असल्याने येथे राहणाऱ्या स्थानिक लोकांन]
येण्या जाण्यास जागा राहत नाही. जर एखाद्या
ठिकाणी तातडीची वैद्यकीय मदत लागली
तर कोणतीही चार चाकी आतमध्ये येत नाहीं
अथवा बाहेर जात नाही अशी स्थिती असते.
त्यामुळे स्थानिक रहिवाशांनीन गरपालिकेकडे आम्हालाही मंडईच नको
अशी मागणी केली. त्यामुळे आता या भाजी
मंडईची फेररचना करण्याची गरज आहे.
कोणत्याही शेतकऱ्यांचा कसलाही येथे
कोणालाही त्रास नाही. त्यामुळे शेतकयांना
डावलण्याचा विषयच नाही. उलट या
ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांना जागा निश्चित
करावयाची असून यामध्ये शेतकऱ्यांना
देखील काही जागा उपलब्ध करून दिली
जाणार असल्याचे सांगितले. ही सगळी रचना
होण्यासाठी आजही भाजी मंडई बंद
ठेवल्याचे सांगितले…
नगरपरिषदेचे म्हणणे काय?
दरम्यान या संदर्भात नगर परिषदेचे
मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याशी संपर्क
साधला असता त्यांनी रहिवाशांनी या संदर्भात
तक्रार केल्याचे सांगितले. अनेक जण
बाहेरून िक्रेते येतात. शेतक्यांच्या
नावाखाली विक्रेते येत असल्याने त्याचा त्रास
होत असून आम्हाला येथे भाजी मंडई नको
अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
सध्या असलेल्या भाजी मंडईमध्ये जागा
निश्चिती करून सर्व विक्रेत्यांना ठराविक
क्षेत्रफळाच्या जागा निश्चित करण्यावर सूचना
दिलेल्या आहेत असे ते म्हणाले…
शेतकऱ्यांचं म्हणणं काय?
दरम्यान शेतकऱ्यांचा सूर वेगळाच आहे,
काही शेतकन्यांशी संवाद साधला असता
त्यांनी सांगितले की, येथे स्थानिकांची
मक्तेदारी निर्माण झाली आहे. शेतकरी
आपल्या शेतातील भाजीपाला किंवा
पालेभाज्या घेऊन येतात जो शेतकरी
ठराविक भाजीपाला घेऊन येतात त्यांना
तुम्ही विक्रेते कसे ठखू शकता? मुळात
शेतकरी अल्प दरात ही संतुषट होतात. आणि
ग्राहक त्यांच्याकडे जास्त गर्दी करतात.
त्यामुळे ग्राहकांची विशिष्ट दरासाठी
अडवणूक करणाऱ्या विक्रेत्यांकडे गिन्हाईक
कमी राहते. अगोदर आमच्याकडून खरेदी
केली जाते. त्यामुळे आमची विक्री होत नाही
अशा नाराजीतून स्थानिक विक्रेत्यांनी लॉबिंग
केले आहे…
त्याचा फटका आम्हाला बसणार आहे. कारण
नगरपालिकेने या विक्रेत्यांनाच जागा
ठखण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ते
सगळेजण एकत्र येऊन त्यांच्या जागा निश्चित
करतील व जिथे कोणी फिरकणार नाही अशा
ठिकाणी आम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना जागा
देतील. हा अन्याय आहे. शेतकरी दिवसभर
विकत बसत नाही. त्याच्या वस्तू संपल्या की
तो निघून जातो. शिवाय शेतकरी अडवणूक
करून भाजीपाल्याचे दर ठरवत नाही.वाजवी
दरात भाजीपाला मिळत असल्याने ग्राहक
त्यांच्याकडून प्राधान्याने खरेदी करतात…
म्हणून विक्रेत्यांनी काही ठराविक स्थानिक
रहिवाशाना पुढे करून अशा प्रकारची तक्रार
दिली. या तक्रारीच्या आडून ते शेतकऱ्यांना
लक्ष्य करू पाहत आहेत. याचा विचार कोणी
करणार आहे की नाही असा असावा या
शेतकन्यांनी केला….




