भिगवण येथील मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात पुकारलेल्या बंदला दौंड शहरातून आमदार समर्थक यांच्या कडून जोरदार विरोध. पण विरोधाला बळी न पडता धनगर समाज नेते पांडुरंग मेरगळ यांनी केले दौंड शहरात जोरदार भाषण ..!
🔥MK NEWS36
जयदीप बगाडे
दौंड प्रतिनिधी,दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात आज सकल हिंदू समाजाने दौंड, इंदापूर व बारामती बंद चे आव्हान केले होते.हया मध्ये इंदापूर, बातमी मध्ये बंद पाळण्यात आला पण दौंड शहरातील आमदार राहूल कुल यांच्या समर्थकांनी दौंड बंदला विरोध दर्शवला काही काळ वातावरण तापले होते. परंतु हा विरोध झुगारून धनगर समाज नेते पांडुरंग अण्णा मेरगळ यांनी जोरदार भाषण दौंड शहरातील मुख्य संविधान स्तंभ चौकात करून आमदार समर्थक कार्यकर्त्यांना एकाकी पाडले असल्याचे बोलले जात आहे, दरम्यान सरपंच वस्ती गोपाळ वाडी कडकडीत बंद मात्र दौंड शहरातील व्यापारी संघटनेचे दोन्ही अध्यक्ष हे राहूल कुल समर्थक आहेत. ह्यांनी दूपारी हिंदू संघटनांनी बंद करण्याचे आव्हान करत दौंड शहरात प्रवेश केला आणि लगेच आमदार समर्थक यांनी विरोध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमाव जमला ह्या मूळे पोलिस प्रशासन यांना त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवावा लागला. हया विरोध करणारे मध्ये व्यापारी कमी आमदार समर्थक गटनेते व नगरसेवक जास्त प्रमाणात होते ह्या मूळे दौंड शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. हया विरोधामुळे आमदार यांच्या वर मुलीच्या आईने, नातेवाईक आणि आमदार पडळकर यांनी जे स्थानिक आमदार यांच्या वर आरोप केले आहेत. एक प्रकारची पुष्टी बंदला विरोध करणारे यांच्या कडून झाली आहे.आसे जाणकारांचे मत आहे. हया अश्या विरोधामुळे दौंड चे आमदार भविष्य काळात राजकीय संकटात सापडले जातील असे देखील जाणकार बोलत आहे. सकल हिंदू समाजाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद पुकारला होता. संपूर्ण दिवस नाही त्यामुळे व्यापारी यांचे फार मोठे नुकसान होणार होते आसे देखील नाही.पण व्यापारी दूकाने बंद करत नसल्याचे पाहून सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद करण्याचे आव्हान करत दूकाने बंद करत असताना हि बातमी आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांन प्रयत्न पोहोचली आणि विरोध करण्यासाठी व्यापारी कमी गटनेते व नगरसेवक हे पुढे सरसावले आणि ह्या मुळे काही काळ वातावरण तापले. हया अश्या प्रकारे विरोध झाल्याने मात्र हिंदू समाजात व धनगर समाजात नाराजी पसरली असून अति उत्साही कार्यकर्ते मुळे भविष्यात दौंड चे आमदार राहुल कुल अडचणीत येण्याची शक्यता दौंड शहर व तालुक्यात वर्तवली जात आहे. हया आगोदर आमदार राहुल कुल यांनी धनगर समाजाचे नेते महादेव जानकर रा.स.प पक्षाचे अध्यक्ष यांना धोका दिला आहे. महादेव जानकर यांच्या मूळे आमदार राहुल कुल पहिल्यांदा आमदार झाले ह्याचा विसर आमदार राहुल कुल यांना पडला आहे का? दौंड तालुक्यात धनगर समाजाची लोकसंख्या जास्त असून प्रथम आमदार धनगर समाजाच्या मतांवर राहूल कुल आमदार झाले होते हे देखील संपूर्ण दौंड तालुक्यातील जनतेला माहीत आहे. दूसरे वेळी फाॅर्म भरताना शेवटच्या क्षणापर्यंत आमदार राहुल कुल यांनी धनगर समाज व धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना अंधारात ठेवून भाजपाचा ए.बी. फाॅर्म जोडला मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे राहूल कुल पाच ,सहाशे मतांनी विजयी झाले. आत्ताच झालेल्या निवडणुकीत मात्र पुन्हा आमदार राहुल कुल यांना साथ दिली तसेच दलित समाजाने सुद्धा साथ दिली आणि चांगले मताधिक्य घेऊन आमदार विजयी झाले. पण भिगवणचे प्रकरण आणि ह्या पद्धतीने आमदार राहुल कुल यांचे समर्थक धनगर समाज व संकल हिंदू समाजाने पुकारलेल्या बंदला विरोध दर्शवत आहे तर त्याचा राजकीय फटका आमदार राहुल कुल यांना बसणार असल्याचे जाणकार, विश्लेषक बोलत आहे. आमदार राहुल कुल यांनी वेळीच आती उत्साही कार्यकर्ते यांना तंबी दिली पाहिजे असे सुद्धा मत व्यक्त होत आहे. येणारे काळात आमदार राहुल कुल अश्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना काय सल्ला देतात. व धनगर समाज व सकल हिंदू समाज हा राहुल कुल यांच्या सोबत राहिल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




