ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

बारामती भीषण अपघात: दोन चिमुकल्यांसहचौघांचा मृत्यू – प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात संतप्त बारामतीकर प्रमुख प्रशासनाला आज देणार निवेदन…


MK NEWS 36/प्रतिनिधी

बारामती भीषण अपघात: दोन चिमुकल्यांसहचौघांचा मृत्यू – प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात संतप्त बारामतीकर प्रमुख प्रशासनाला देणार निवेदन…

बारामती/ प्रतिनिधी;
रविवारी बारामतीत घडलेल्या भीषण अपघातात एका वडिलांसह त्यांच्या वडिलांचा (आजोबा) आणि दोन निष्पाप चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण शहर शोकमग्न असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे.

या अपघातामागे वाहतुकीवरील प्रशासन — म्हणजेच आरटीओ आणि पोलीस विभाग — यांच्या गंभीर दुर्लक्षिततेमुळेच हे बळी गेले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे..

आरटीओ व पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप?

आरटीओ विभागाकडे वाहनाची फिटनेस तपासणी, लांबी-रुंदी आणि क्षमतेप्रमाणे लोड घेतले जात आहे का? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. मात्र, हे अधिकारी प्रत्यक्षात केवळ वरवरची तपासणी करत आहेत? आणि त्यातून पैसे गोळा करण्याकडेच लक्ष देत असल्याचा आरोप? नागरिकांनी केला आहे.

तसेच, वाहतूक पोलीस गर्दीच्या भागात ट्राफिक नियंत्रण व्यवस्था ठेवण्याऐवजी रस्त्यावर गाड्या थांबवून पावत्या फाडण्यात गुंतले आहेत. त्यांचं खऱ्या अर्थाने वाहतुकीवर नियंत्रण राहिलेलं नाही, अशी भावना बारामतीकरांनी व्यक्त केली आहे.

कारभारी चौक कसबा या ठिकाणी खूप ट्राफिक होता इथे केलेल्या अतिक्रमणाबद्दल ट्राफिक पोलिसांचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का? शोरूम व शोरूम ने केलेले अतिक्रमण काढण्यात पोलिसांना पूर्णपणे अपयश ? यात वाहतूक पोलिसांच प्रमुख लक्ष देतील का हा नागरिकांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न? का फक्त गरिबांचेच अतिक्रमण काढणार रोड मोकळा करण्याच्या नावाखाली..!

काल १४ जड वाहनांवर कारवाई झाली हे कारवाई फक्त दाखवण्यापुरते आहे का ? हा नागरिकांना पडलेला प्रश्न?

समस्त बारामतीकरांकडून प्रमुख प्रशासनाला निवेदन..

या अपघातामुळे संतप्त झालेल्या समस्त बारामतीकरांकडून स्थानिक प्रशासनाला निवेदन दिलं जाणार आहे. या निवेदनात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई, वाहतुकीचं सुरळीत नियोजन, फिटनेस तपासणीत पारदर्शकता आणि अपघातग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यांसाठी जोरदार मागण्या करण्यात येणार आहेत..

नागरिकांचा सवाल:

प्रशासनाची झोप आणखी किती बळी गेल्यावर उडणार?

निष्पाप जीव गमावल्यावरच का हालचाल?

जबाबदार अधिकाऱ्यांवर कधी होणार कारवाई?

हा अपघात केवळ एक शोकांतिका नसून, प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजाची साक्ष देणारी घटना ठरली आहे. आता तरी यावर ठोस पावले उचलली जातील का, याकडे संपूर्ण बारामतीचं लक्ष लागलं आहे…


Translate »
error: Content is protected !!