क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

शिक्षण विभागात ‘एसआयटी’ची सर्वात मोठी कारवाई..


MK NEWS 36/ प्रतिनिधी नागपूर:

सिद्धेश्वर काळुसे           रोहिणी कुंभार

शालार्थ आयडी (Shaalaarth ID) हा शिक्षण विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा ओळख क्रमांक आहे…

🔹 शालार्थ आयडी म्हणजे काय?

शालार्थ (Shaalaarth) आयडी हा महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागाकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा एक एकमेव ओळख क्रमांक (Unique ID) आहे.

🔹 शालार्थ आयडीचा वापर कुठे होतो?

1. पगार व वेतन व्यवस्थापन (Payroll Management)
– शासकीय व अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा पगार शालार्थ प्रणालीद्वारे होतो.

2. सेवा नोंदी व्यवस्थापन (Service Records)
– कर्मचारी बदली, बढती, सेवा मुदतवाढ इ. सर्व नोंदी शालार्थवर अपडेट केल्या जातात.

3. शाळेच्या माहितीचे संकलन
– शाळा, कर्मचारी, विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी शालार्थचा उपयोग होतो..

🔹 कोणी तयार करतो शालार्थ आयडी?

शाळेतील मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख https://education.maharashtra.gov.in/sanch/shaalaarth/ या संकेतस्थळावरून शिक्षकाची माहिती भरून शालार्थ आयडी निर्माण करतात..

नागपूर: नागपूरसह राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी तपासासाठी गठीत ‘एसआयटी ने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक नव्या आणि धक्कादायक बाबी समोर येण्याची शाक्यता असल्याने पोलिसांनी सत्र न्यायालयात ‘रिकिजन’ अर्ज ‘दाखल करणार असल्याची माहिती आहे.
राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई असून शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून रीतसर शालार्थ आयडीचे आदेश जारी झाले नसताना. मात्र शिक्षण विभागातील काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर केला व बनावट शालार्थ आयडी तयार केले. माध्यमातून बोगस शिक्षकांना कोट्यवधी रुपयांचा वेतन अदा करून शासनाला कोट्यवधींचा चुना लावण्यात आला…

👨‍✈️ पोलिसांकडून दोघांनाही अटक-

सदर प्रकरणात आतापर्यत अटक झालेले आरोपी व दस्तावेजांच्या तपासानंतर पोलिसांना या प्रकरणात सिद्धेश्वर काळुसे  व रोहिणी कुंभार यांचादेखील समावेश असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धेश्वर काळुसे हे १६ मार्चः २०२४ पासून आजपर्यत शक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.तर रोहिणी कुंभार या २१मार्च २०२२ ते १५ मार्च२०२४या कालावधीत शिक्षणाधिकारी होत्या.त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात बोगस शालार्थ आयडी जारी झाल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाहीं बुधवारी अटक केली..

👨‍✈️पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात आता पोलिसांचीच राज्यपातळीवर एसआयटी गठित करण्यात आली आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणी सर्व तक्रारी या एस आय टी अंतर्गत एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. नागपुरातील झोन 2 चे पोलिस उपायुक्त नित्यानंद झा
हे सध्या नागपुरात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करत आहेत. आता त्यांच्या नेतृत्वात राज्यातील इतरही जिल्ह्यात या घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे..
नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातून आतापर्यत या घोटाळ्यात 24 अधिकारी आणि मुख्याध्यापकांना अटक करून प्राथमिक आरोपपत्रही न्यायालयात दाखल केले आहे. नागपूर पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथेही बनावट शालार्थ आयडी प्रकरणारी संबंधित 3 गुन्हे दाखल आहेत. घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरात असल्याने तपास पथकाची अधिकार कक्षा वाढवण्यास पोलिस महासंचालक रेशमी शुक्ला नी मंजुरी दिली आहे…
या प्रकरणाचे धागेदोरे खूप व्यापक व अशा प्रकारचे पुणे नगर बीड सोलापूर व इतर यासारख्या प्रमुख शहरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या एसआयटीमार्फत सगळ्या जिल्ह्यांची शिक्षणाधिकारी यांची चौकशी व्हावी अशी नागरिकांमधून मागणी आहे..

यामुळे हे एक गंभीर प्रश्न निर्माण होतो की,
गोरगरिबाच्या मुलांनी शिक्षक व इतर सरकारी नोकरी यासाठी प्रयत्न करावा की नाही हा मोठा प्रश्न आहे?..


Translate »
error: Content is protected !!