ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

दौंडमध्ये विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण २० पोलीस अंमलदारांचा गौरव सोहळा उत्साहात..!


🔥MK NEWS36 

दौंड : राज्य राखीव पोलीस बल गटातील विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ मध्ये यश संपादन करणाऱ्या सुमारे २० पोलीस अंमलदारांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, दौंड तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात यशस्वी पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष हिरालाल साळवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड, सचिव कृष्णा शिवशरण, तालुका खजिनदार विजय मोरे, तालुका संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहराध्यक्ष अमोल आवारे, शहर उपाध्यक्ष दिनेश वाल्मिकी तसेच सभासद आबा पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे प्रवक्ते दिनेश पवार यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे पोलीस निरीक्षक हरिभाऊ जायभाय, कुसडगाव गट क्रमांक १९ चे जेपीआय निकम, नानीज प्रशिक्षण केंद्र दौंडचे पीआय आप्पा राऊत उपस्थित होते. तसेच निलावती उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सुरेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल माशाळकर आणि सागर कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सुहास साळवे यांनीही उपस्थिती लावली.

कार्यक्रमासाठी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे रक्षक जमादार वैजनाथ मदने यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी इयत्ता तिसरीत शिकणारी चिमुकली प्रांजल जाधव हिने पोलिसांविषयी मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान, संघटनेच्या दौंड तालुका सल्लागारपदी सुनील वामनराव काळे, दौंड शहर सचिवपदी विशाल माशाळकर आणि दौंड शहर सल्लागारपदी सुरेश निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


Translate »
error: Content is protected !!