ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बहुजन समाज पार्टीच्या बहीणजी यांचा वाढदिवस दौंडमध्ये जल्लोषात साजरा..!


🔥MK NEWS36

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा बहीणजी यांचा वाढदिवस दौंडमध्ये उत्साहात साजरा
दौंड | प्रतिनिधी
मायावती उर्फ बहीणजी यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड शहरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बहुजन समाज पार्टीच्या वतीने संविधान चौकात आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संविधान चौकात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला. कार्यक्रमास माजी तालुकाप्रमुख राजू गायकवाड, धेंडे साहेब यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांनी बहीणजी यांच्या सामाजिक व राजकीय कार्यावर चर्चा करत त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन चळवळीला नवी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी पुण्यातील कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळावे, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किरणजी अल्हाट, प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष विजय जगताप, प्रभारी श्रीपती चव्हाण, प्रभारी उमाकांत कांबळे, जिल्हा प्रभारी धनंजय पोळ यांच्यासह राजू गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


Translate »
error: Content is protected !!