ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“खंडणीला नकार पडताच कोयत्याने वार! बारामतीत हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला”…!


🔥MK NEWS36 

बारामतीत खंडणीसाठी जीवघेणा हल्ला; चायनीज हॉटेल चालकावर कोयत्याने वार, 8,300 रुपयांचा दरोडा..!
बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरात खंडणी न दिल्याच्या रागातून एका चायनीज हॉटेल चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश सिद्धनाथ काळे (वय 29, व्यवसाय – हॉटेल, रा. देसाई इस्टेट, बारामती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8.19 वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर, चिंचकर चौक येथील त्यांच्या “आपले चायनीज” नावाच्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.
फिर्यादीने सांगितले की, सुमारे 15 दिवसांपूर्वी आरोपींनी हॉटेल चालू ठेवण्यासाठी प्रोटेक्शन मनी (खंडणी) मागितली होती. मात्र, हप्ता देण्यास नकार दिल्याने आरोपींनी राग मनात धरून संगनमताने हॉटेलमध्ये घुसखोरी केली.
यातील आरोपी
1) विनायक मारक (मांबरी), 2) राहुल चव्हाण, 3) राज गावडे, 4) आदित्य बगाडे, 5) निहाल जाधव, 6) विवेक (पूर्ण नाव अज्ञात) तसेच दोन अनोळखी तरुणांनी मिळून फिर्यादीवर कोयत्याने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हॉटेलच्या गल्ल्यातील 8,300 रुपये रोख रक्कम (500 रुपयांच्या 16 नोटा व 100 रुपयांच्या 3 नोटा) जबरदस्तीने काढून घेत शस्त्राच्या धाकाने दरोडा टाकून फरार झाले.
या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांना पोलीसांकडून मेडिकल यादी देण्यात आली होती. उपचारानंतर दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 471/2025 अन्वये BNS कलम 311, 308, 310, 109, 115(2), 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद स्टे. डायरी क्रमांक 037/2025, दिनांक 24/12/2025 रोजी सायं. 4.11 वाजता करण्यात आली होती.
सदर गुन्हा पोलीस हवालदार श्री. धुमाळ यांनी दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास मोरे करीत आहेत.
विशेष म्हणजे, काही आरोपींवर यापूर्वीही खून, खंडणी व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर नागरिकांतून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!