क्राईमब्रेकिंग न्यूज

बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेत शाखाधिकाऱ्यांने केला ९ कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार..


बारामतीतील पंढरपूर अर्बन बँकेत शाखाधिकाऱ्यांने केला ९कोटी ३ लाख ३६१ रुपयांचा अपहार

10 ग्राहकांच्या नावे बनावट खाती…

पंढरपूर अर्बन को-ऑप बँक लि. पंढरपूर या बँकेच्या बारामतीतील शाखाधिकायाने बनावट कागदपत्राच्याआधार या बँकेत
सुमारे 9 कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे.अमित प्रदीप देशपांडे (रा.गुरुसदन हौसिंगसोसायटी, बारामती) या शाखाधिकाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

अमित प्रदीप देशपांडे (रा.सहयोग सोसायटी समोर, गुरुसदन हौसिंग सोसायटी, बारामती) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या.शाखाधिकायाचे नाव आहे. या प्रकरणी बँकच्या मुख्य शाखेकडून कृष्णकुमार पुरुषोतम पंडाल (रा. कोर्टी रोड, परिचारकनगर,पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्यादि दिली आहे.
‘ते मुख्य कार्यालयात व्यवस्थापक म्हणून काम करतात. पंढरपूर ‘बकेच्या राज्यात 30 शाखा आहेत. ‘बारामतीत भिगवण रोड,जळोची येथे एक शाखा आहे. तेथे अमित देशपांडे हे शाखाधिकारी म्हणून काम करतात.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी ताळेबंदपत्रकाचे अवलोकन केले असता बारामती शाखेत संशयास्पद
व्यवहार होत असल्याचे त्यांना दिसून आले.त्यांनी फिर्यादीला तपासणीचेआदेश दिले. त्यानुसार तपासणी केली गेली त्यात हीबाब स्पष्ट झाली..

देशपांडे यांनी पदाचा गैरवापर करत तसेच कॅशिअर कम क्लार्क साधना कळंत्रेयांच्या कोडचा वापर करत बनावट कागदपत्रे तयार केली. ती खरी असल्याचे भासवत बँकेत अपहार व अफरातफर केली. बारामती शाखेच्या सस्पन्स रिसिव्हेबल खात्यातून अधिकार नसताना 2 कोटी 30 लाख रुपये परस्पर उचल करुन ती त्यांनीच उघडलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या खात्यात टाकली.

बॅक ऑफ बडोदा येथे भरणा करण्यासाठी 31 लाख रुपये काढत त्या रकमेची परस्पर विल्हेवाट लावली. धन्वंतरी पतसंस्थेच्या नावे पाच बनावट ओडीटीडीआर खाते उघडून त्यातील 3 कोटी 23 लाख 71 हजार 897 रुपये स्व:तच्या फायद्यासाठी वापरले.

तसेच बारामती शाखेतील ग्राहकांचे सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये 83 खातेदारांचे बँकेत ठेवलेले खरे दागिने काढ्र्न तेथे,बनावट दागिने ठेवले. खरे दागिने बाहेरील फायनान्स कंपन्यांना देत त्यावर कर्ज काढले. 10 ग्राहकांच्या नावे बनावट खाती काढली.त्यावर बनावट सह्या करुन त्या खात्यावर कर्ज वितरित केल्याचे व त्या बदल्यात सोने ठेवल्याचे दाखवून त्यांच्या नावे बँकेत बनावट सोने ठेवले, त्याद्वारे 37 लाख 56 हजार 803 रूपये स्वतःसाठी वापरले.

बँकेतील सोने तारण कर्ज खाते प्रकारामध्ये 3 कोटी 18 लाख 37 हजार 464 रुपयांचा अपहार केला. अशी एकूण बँकेची 9कोटी 3 लाख 361 रुपयांचा अपहार करत बँकेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस निरीक्षक विलास नाळे पुढील तपास करत आहेत…


Translate »
error: Content is protected !!