पंचनाम्यावर खोटी सही? बनावट केमिकल प्रकरणात कारवाईच संशयास्पद?
🔥MK NEWS36
🔴 परवाना शून्य, कारवाई शून्य?
🔴 एक्साईज रेड होती की आर्थिक ‘सेटिंग’चा खेळ?
🔴 पंचनाम्यावरच खोटी सही तर पंचनामा वैध कसा?
🔴 बनावट केमिकलचा साखर कारखान्यांना पुरवठा – नागरिकांच्या जीवाशी खेळ?
🔴 राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला ब्रेक लागला का?
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती|
बारामतीत १६ व १७ नोव्हेंबर रोजी झालेली एक्साईज विभागाची तथाकथित ‘रेड’ आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण ज्या केमिकल फॅक्टरीवर कारवाई झाल्याचे दाखवण्यात आले, त्या फॅक्टरीकडे एकही वैध केमिकल परवाना नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, परवाना नसतानाही संबंधितांना सूट कशी दिली गेली?
ही रेड खरंच कारवाई होती, की फक्त आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरण मिटवण्यात आले? असा थेट सवाल आता बारामतीतील नागरिक विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे, डुप्लिकेट व बनावट केमिकलचा पुरवठा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे, मात्र तरीही प्रशासनाने आजवर ठोस कारवाई का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
❓ सप्लाय लायसन्स तपासलंच का?
या फॅक्टरीकडून नेमके कोणते केमिकल, कोणत्या परवान्याने आणि कोणाला पुरवले जात होते, याची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली का? की केवळ कागदी कारवाई करून डोळेझाक करण्यात आली? जर सप्लायर्सकडेच वैध लायसन्स नसतील, तर हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा ठरतो.
❗ पंचनाम्यावर खोटी सही?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पंचनाम्यावर एका पंचाची सहीच खोटी असल्याची चर्चा आहे. जर हे सत्य ठरले, तर असा पंचनामा कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरता येईल का? की संपूर्ण कारवाईच संशयास्पद ठरते?
⚠️ साखर कारखाने म्हणजे जनतेचा जीव..!
साखर कारखान्यांना पुरवण्यात येणारे केमिकल हे थेट जनतेच्या आरोग्याशी संबंधित असते. साखर प्रत्येक घरात वापरली जाते. जर त्यात वापरले जाणारे केमिकल बनावट किंवा डुप्लिकेट असेल, तर हा नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही का?
🏛️ राजकीय हस्तक्षेपाची चर्चा?
या प्रकरणात अजित पवार यांचे नाव चर्चेत येत आहे. कारण संबंधित केमिकल फॅक्टरीचा मालक हा अत्यंत जवळच्या व जबाबदार नगरसेविकेचा पती असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई थांबवण्यात आली का? हा प्रश्न नागरिक खुलेआम विचारत आहेत.
जर पंचनामा संशयास्पद असेल, लायसन्स अपूर्ण असतील आणि तरीही कारवाई होत नसेल, तर प्रशासन नक्की कुणाच्या दबावाखाली काम करत आहे?
👉 येणाऱ्या काळात या प्रकरणातील अधिक धक्कादायक माहिती व पुरावे उघड होणार आहेत.
👉 प्रशासनाला जाब विचारला जाणार आहे.
👉 सत्य बाहेर येईपर्यंत हा आवाज थांबणार नाही.
वाचत राहा – MK NEWS36
*कारण इथे बातम्या नाहीत, तर प्रश्न विचारले जातात…



