माळेगाव मध्ये नवीन मटका किंग उदयास… कोणाच्या आशीर्वादाने?
माळेगाव मध्ये नव्याने चालू झालेला मटका हा दोघेजण पार्टनरशिपमध्ये चालू झाला आहे यांना आशीर्वाद कोणाचा? , पोलीस प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे आम्ही नागरिकांमध्ये जाऊन त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर असं लक्षात आलं की “अक्षय व सनी” या दोघांनी मिळून मटक्याचा नवीन धंदा चालू केला आहे माळेगाव मध्ये सध्या ऊसतोड कामगार यांच्यामुळे माळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे याचाच फायदा घेऊन यांनी कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला हप्ता देऊन? मटके चा धंदा चालू केला आहे? नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे आम्ही नागरिकांमध्ये जाऊन मत जाणून घेताना त्यांनी चर्चेमधून पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव दबक्या आवाजात सांगितले.
आणि त्यांचे असेही म्हणणे आहे की डी वाय एस पी ऑफीस ॲडिशनल ऑफिस यामध्ये अधिकाऱ्यांना माहिती आहे का? फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या गोष्टी ठरवले आहेत हा पण एक चर्चेचा विषय आहे.. यांना सुद्धा त्यांनी भेटून पैशाचे बोलणे करून घेतले आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात जर धंदे चालू असतील आणि कारवाई होत नसेल तर नागरिकांमधील चर्चा सत्य असावी..
यामध्ये माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष देतील का पुन्हा एकदा बारामती जसे मटक्यासाठी खून झाला तसे एखादा मोठा गुन्हा होईपर्यंत हे वाट बघणार आहेत का लोकांचे संसार ना संसार उध्वस्त झाले या मटक्याच्या पायी!
का फक्त स्वतःच्या स्वार्थापायी हे लोक (पोलीस प्रशासन)जाणून-बुजून दुर्लक्ष करणार आणि कायद्याचा धाक फक्त गरिबांसाठीचा आहे का अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे…
यामध्ये आता एसपी ऑफिस यांनाच तक्रार करावी लागणार कारण इथले पोलीस प्रशासन यांना कारवाई करणार नाही असे त्यांचे दोघांचेही (अक्षय व सनी) ठाम मत आहे? कारण आम्ही परमिशन घेऊन (म्हणजे हप्ता देऊ) धंदे चालू केले आहे.? असे नागरिकांमध्ये चर्चा आहे..
एम के न्यूज या गोष्टीचा पाठपुरावा करणार..




