माळेगाव मध्ये दोन नंबर धंद्यात अजून एका धंद्याची भर…
माळेगाव म्हटलं की शारदानगर, माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज असे चांगल्या प्रकारे शिक्षण असल्याचे माहेरघर म्हटले जाते ,पण आता नव्याने ओळख पुसून दोन नंबर धंद्याचे माहेरघर अशी ओळख होऊ लागली आहे इतर वेळेस माळेगाव हे साखर कारखान्यासाठी साखरेला जास्त भाव देण्यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे . आणि आता दोन नंबरचे धंदे यासाठी सुद्धा डबल हप्ता घेऊन ?धंदे चालू ठेवायचे यासाठी सुद्धा प्रसिद्ध होऊ लागला आहे का ?अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.ती म्हणजे दोन नंबरचे धंदे खुलेआम जोरात चालू..
काही दिवसांपूर्वी माळेगाव हद्दीतील अवैद्य मार्गाने दारू विक्री हातभट्टी पत्त्याचा क्लब असे प्रकारे एक ना अनेक अवैद्य धंदे पहिल्यापासून चालू आहेत?आता यात नव्याने मटक्याचा धंदा आहे. ही खुल्या चालू झाला आहे ,नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आणि नाराजी व्यक्त होत आहे कारण माळेगाव हद्दीतील सर्व अवैद्य धंदे हे खुलेआम चालू आहेत तरी याच्यावर पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का ? हा एक चर्चेचा विषय आहे .
मटक्याचा धंदा माळेगाव , मेडद आशा एक ना अनेक गावात खुलेआम मटक्याचा धंदा कालपासून जोमात चालू झाला आहे यांना नक्की , कुणाचा आशीर्वाद ?
“माळेगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना कोणा वरिष्ठांचा धाक आहे की नाही”
हा पण एक चर्चेचा विषय कारण धंदे बंद होत नाही…
या गोष्टीकडे आता तरी वरिष्ठ लक्ष देतील का? डीवायएसपी ऑफिस, ॲडिशनल एस पी, एस पी ऑफीस. यांच्याकडून कारवाईची अपेक्षा ! कारण माळेगावचे पोलीस निरीक्षक जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष देत नाही का?अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे आत्तापर्यंत अनेकांनी एवढ्या बातम्या लावून सुद्धा एकही ठोस कारवाई किंवा धंदे बंद होण्याऐवजी हप्त्यात वाढ करून धंदे चालू करण्यात आले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे तरी यामध्ये दोन नंबर धंदे चालू ठेवण्यासाठी कोणत्या पोलीस कर्मचारी आशीर्वाद आहे का? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
एम के न्यूज या गोष्टीचे पाठपुरावा करणार आहे..
“आपण पुढे नागरिकांच्या व वरिष्ठ अधिकारी यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत यावर मत काय…




