इंदापूर–भिगवण रोडवर बेकायदेशीर सिम विक्रीचा धुमाकूळ!
MK NEWS 36 प्रतिनिधी
BARAMATI:
इंदापूर व भिगवण रोडवर रस्त्यावरच बेकायदेशीर सिम विक्री – नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक..
इंदापूर रोड व भिगवण रोड परिसरात रस्त्यावर उभे राहून बेकायदेशीर पद्धतीने सिम कार्ड विक्री करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अधिकृत परवाना किंवा शॉप ॲक्ट लायसन्स नसताना हे लोक मोटारसायकलवर किंवा थेट रस्त्याच्या कडेला उभे राहून सिमकार्ड विकतात.

फसवणुकीचा प्रकार :
या विक्रेत्यांकडून लोकांना दोन महिन्यांचे फ्री रिचार्ज देण्याचे आमिष दाखवले जाते. मात्र, प्रत्यक्षात एक महिन्याचाही रिचार्ज मिळत नाही. अनेक वेळा सिम सुरु झाल्यानंतर नेटवर्क अथवा सेवा न मिळाल्याने नागरिक अडचणीत सापडतात. यामध्ये आतापर्यंत ५० ते ६० नागरिकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांचा आक्रोश :
अशा प्रकारे बेकायदेशीर सिम विक्री सुरू असल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे. “मोबाईल सेवा कंपन्यांच्या नावाखाली ही फसवणूक सुरू आहे. रस्त्यावर सिम विकणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी,” अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाची जबाबदारी :
या प्रकरणात टेलिकॉम कंपन्या, पोलिस विभाग आणि प्रशासन यांना जबाबदार धरत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर सिम विक्री होत असताना अधिकारी व पोलीस डोळेझाक का करत आहेत?




