ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

निवडणूक आयोगाच्या विरोधात स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरू करणार —वसंतराव साळुंखे


🔥MK NEWS 36

सचिन आटोळे
(तालुका प्रतिनिधी)
दौंड विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ मध्ये मतदार यादीतून ३१ हजार मतदारांची नावे बेकायदेशीर व नियम बाह्यरीतीने वगळून त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेऊन या ३१ हजार मतदारांना मतदानापासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ पाटस स्मशानभूमीमध्ये जय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी उपोषण केले होते,

वसंतराव साळुंखे..

सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये या दौंड विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदान संख्या ३ लाख ९ हजार होती सन २०२४ च्या निवडणुकीला त्यामध्ये वाढ होण्याऐवजी ५००० मतांची घट होऊन ती ३ लाख ४ हजार झाली. तसेच २०१९ ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये २६५०० मतदारांची नावे नव्याने नोंदली गेली, म्हणजेच २०१९ ची एकूण मतदार संख्या ३ लाख ९ हजार अधिक २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत पाच वर्षात नवीन नोंदणी झालेले २६५०० मतदार संख्या, म्हणजेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत या दौंड विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या ३ लाख ३५ हजार ५०० व्हायला पाहिजे होती, परंतु त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दौंड विधानसभा मतदारसंघ यांनी जाणीवपूर्वक राजकीय वरदहस्थापोटी विद्यमान लोकप्रतिनिधींना त्यामध्ये मदत व्हावी या हेतूने ३१ हजार मतदारांची नावे कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न राबविता परस्पर वगळली होती ,त्यामुळे या ३१ हजार मतदारांना २०२४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानापासून संबंधित निवडणूक अधिकारी यांनी जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवलेले होते या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी यासाठी निवडणूक आयोग नवी दिल्ली, निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे यांना वेळीच तक्रार दाखल करून या संपूर्ण बेकायदेशीर व नियमबाह्य मतदार वगळण्याच्या प्रक्रियेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व या ३१ हजार मतदारांना मतदानापासून वंचित न ठेवता त्यांची नावे पुन्हा या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट करावीत, अशी लेखी मागणी केलेली होती परंतु निवडणूक आयोगाने याबाबतची कोणतीही दखल घेतलेली नाही. म्हणून या ३१ हजार मतदारांची निवडणूक आयोगाचे दौंड विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी राजकीय वरद हस्तापोटी विद्यमान राजकीय लोकप्रतिनिधींना निवडणुकीत मदत व्हावी या हेतूने जाणीवपूर्वक या मतदारांची नावे वगळलेले असल्याने व त्यावर निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारची दखल न घेता व कार्यवाही करत नसल्याने निवडणूक आयोगाच्या विरोधात पाटस स्मशानभूमीमध्ये निवडणूक आयोगाचा निषेध म्हणून उपोषण केलेले होते, त्यानंतर हे उपोषण त्यावेळी तात्पुरते स्थगित ठेवून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने या मी केलेल्या मागणीच्या अर्जावर कोणतीच दखल घेतली नाही, तर सदरचे उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल असे त्यावेळी जाहीर करण्यात आलेले होते. आज अखेर निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारची चौकशी करून कारवाई केलेली नसल्याने या ३१ हजार मतदानावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पुन्हा या ३१ हजार मतदारांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निषेधार्थ पाटस येथील स्मशानभूमीमध्ये निवडणूक आयोगाचा पुन्हा एकदा जाहीर निषेध म्हणून उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती जय शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव साळुंखे यांनी दिली


Translate »
error: Content is protected !!