ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत मोटारसायकल चोरीचा पर्दाफाश; मुख्य आरोपी अटकेत, चार गुन्हे उघड..!


🔥MK NEWS36

बारामतीत मोटारसायकल चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; चार गुन्हे उघड, आरोपी अटकेत

बारामती, दि. 2 मे 2026 (प्रतिनिधी): बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा यशस्वी छडा लावत एकाला अटक केली आहे. या कारवाईत चार वेगवेगळ्या गुन्ह्यांतील चोरीची वाहने जप्त करण्यात आली असून पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. 0166/2026, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार यशवंत पवार यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एक व्यक्ती चोरीच्या मोटारसायकली वापरत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीसोबत एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे समोर आले. पुढील तपासात आरोपीने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या वाहनांची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून यामाहा RXG, हिरो होंडा स्प्लेंडर, यामाहा कंपनीची आणखी एक मोटारसायकल तसेच होंडा अ‍ॅक्टिवा स्कुटी अशी चार वाहने जप्त केली.

या कारवाईत बारामती शहर, बारामती तालुका आणि वेळापूर (जि. सोलापूर ग्रामीण) पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण चार गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

ही मोहीम पोलीस हवालदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली अक्षय सिताफ, रामचंद्र शिंदे, अमोल देवकाते, गिरीश नेवसे, पोपट कवितके, विशाल शिंदे, सागर जामदार तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्या पथकाने राबवली. तपासाचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांनी केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना वाहन पार्क करताना सुरक्षित लॉकचा वापर करण्याचे व CCTV असलेल्या ठिकाणीच वाहने उभी करण्याचे आवाहन केले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!