मेडद येथे बौद्ध समाज मंदिराच्या कामाला सुरुवात..!
🔥MK NEWS 36
सागर जाधव
प्रतिनिधी, बारामती
मेडद येथे बौद्ध समाज मंदिराच्या कामाला सुरुवात
बारामती तालुक्यातील मेडद गावात बौद्ध समाजासाठी प्रथमच समाजमंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा स्थानिक आमदार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या कामासाठी 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
या समाजमंदिरासाठी यापूर्वी जागेसाठी व निधीसाठी अनेकदा शासन दरबारी पाठपुरावा करावा लागला होता. स्थानिक अडचणी दूर करून अखेर या कामाला आज शुभारंभ झाला आहे. हे मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह या नावाने उभारण्यात येत आहे.
सध्या मंजूर झालेल्या 20 लाखांच्या निधीमध्ये प्लॅन-इस्टिमेटनुसार संपूर्ण काम पूर्ण होणार नसल्याने अजून किमान 30 लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याबाबत मेडदचे माजी उपसरपंच अजित कांबळे यांनी, “लवकरच माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून वाढीव निधी उपलब्ध करून हे काम पूर्णत्वास नेले जाईल,” असे आश्वासन दिले.

कामाची सुरुवात सर्व ग्रामस्थ उपस्थित..
कामाच्या प्रारंभी ग्रामपंचायत सदस्या रोहिणी कांबळे, अध्यक्ष प्रशिक कांबळे, तसेच कांबळे परिवारातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समाजातील तरुण ऋषिकेश कांबळे, अजय कांबळे, अक्षय कांबळे, करण कांबळे, अजय गरुड, सुशांत कांबळे यांनी एकत्र येऊन समाजमंदिरासाठी पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लोकवर्गणी करून बोरवेल मारून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली.
मेडद ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने समाजात उत्साहाचे वातावरण आहे.




