ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“बारामतीत स्मार्ट मीटरचा गोंधळ : नागरिकांचा रोष उसळला”


🔥MK NEWS 36 संपादकीय

स्मार्ट मीटर बसवणीवर नागरिकांचा तीव्र विरोध : “विकासाच्या नावाखाली लूट”

बारामती │ MK NEWS 36

बारामती शहरात स्मार्ट मीटर बसवणीच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीची लाट उसळली आहे. विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांची उघड लूट सुरू असल्याची टीका होत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीजबिलाचा बोजा प्रचंड वाढला आहे. सरकारने जाहीर केले होते की फक्त व्यावसायिक (कमर्शियल) मीटरच स्मार्ट करण्यात येतील. मात्र, घरगुती मीटर देखील कुठल्याही पूर्वसूचना न देता बदलले जात आहेत. हे काम बेकायदेशीर पद्धतीने MSEB कडून सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

समर्थ नगर, एमआयडीसी परिसरात अनेक घरांमध्ये मालकांना कल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पसरला असून, “हे प्रयोग नेत्यांच्या घरी का होत नाहीत? फक्त सर्वसामान्यांच्याच घरी का?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

यामुळे मीटर रीडिंगचे काम करणाऱ्या स्थानिक तरुणांचा रोजगार धोक्यात येणार असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्मार्ट मीटर बसवणीनंतर वीजबिले वाढल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याने लोकांमध्ये संताप वाढत चालला आहे.

MK NEWS 36 तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, “स्मार्ट मीटर बसवणीस विरोध करा. जर MSEB ने नागरिकांचे म्हणणे ऐकले नाही, तर आम्हाला त्वरित संपर्क साधा.”


Translate »
error: Content is protected !!