उलटा न्याय… पोलिसांवर मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींविरोधातच गुन्हा दाखल..!
MK NEWS 36/ प्रतिनिधी
उलटा न्याय… पोलिसांवर मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींविरोधातच गुन्हा दाखल
कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ प्रकरणी श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे:
पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण करत त्यांना जातिवाचक शिवीगळ केल्याच्या प्रकरणाने काही दिवसांपूर्वी पुण्यातले वातावरण तापले होते. पुण्यामध्ये पीडितेच्या मदतीला धावलेल्या मुलींवर तपासाच्या नावाखाली पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद भाषा आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी केला होता.
त्या घटनेवरून पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनही झाले होते. पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती, पण पोलिसांविरोधात कुठलाही पुरावा आढळला नसल्यामुळे अशी तक्रार दाखल करुन घेण्यास पोलीस प्रशासनाने विरोध केला होता.
इतका सगळा गदारोळ झाल्यानंतरही कोथरूड पोलिसांनी आता आणखी एक कठोर पाऊल उचलले असून त्याच तीन तरुणींसह आणखी दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ह गुन्हा नोंद केला आहे.
कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावणाऱ्या तीन मुलींपैकी दोन मुली, श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

नेमकं प्रकरण काय होतं?
सामाजिक कार्यकर्ती आणि लेखिका श्वेता पाटीलने सर्वप्रथम कोथरूड पोलिसांची ही अरेरावी उघडकीस आणली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी म्हणून सामाजिक क्षेत्रातील श्वेता पाटीलसह काही मुलींनी पुढाकार घेतला होता. पोलीस अधिकारी असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून ती महिला पुण्यात आली. या संबंधित महिलेच्या नातेवाईकांपैकी एक जण पोलीस खात्यातून निवृत्त असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुण्यात त्यांच्या ओळखीच्या पोलिसांची टीम आणली आणि कोथरूड पोलिसांच्या मदतीने त्या पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता, त्यांच्या घरी धाड टाकण्यात टाकली.
कोणताही कायदेशीर दस्तावेज वा कारण न देता, तिघींनाही जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पासवर्ड बदलण्यात आले तसेच जातिवाचक आणि चारित्र्यहननात्मक शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप या मुलींनी केला होता. एखाद्या पीडित महिलेला इतर माणसांनी साथ देणे याचा समाजाला अभिमान वाटला पाहिजे. पण, उलट याबद्दल सदर महिला आणि तिच्या मैत्रिणी यांचा कोथरूड, पुणे पोलिसांकडून छळ केला गेला. संबंधित तरुणींना पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात आणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत, मारहाण केल्याचा आरोप तरुणींनी केला होता.




