मेडद गावात डॉ. बाबासाहेबआंबेडकर सभामंडपाची प्रतीक्षा संपेना; ठेकेदारावर ग्रामस्थांचा रोष..!
🔥MK NEWS 36
📰 मेडदमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपाच्या कामाला विलंब; ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा..!
सागर जाधव
प्रतिनिधी
बारामती –
मेडद (ता. बारामती) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडप (समाजमंदिर) उभारणीचे काम मंजूर होऊन वर्षभर उलटून गेले तरी कामाचा अजूनही शुभारंभ झालेला नाही. सामाजिक न्याय विभागातून तब्बल २० लाखांचा निधी मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही ठेकेदाराने कामास सुरूवात न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पंचशील नगर, मेडद येथील रहिवासी अर्जदार – सिताराम कांबळे, बाबू कांबळे, विकास कांबळे, सागर कांबळे, योगेश जावळे, आनंद कांबळे, उमेश कांबळे, संदिप कांबळे, चंचल कांबळे व अनिल भोसले – यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बारामती यांना दिलेल्या निवेदनात ही नाराजी नोंदवली आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, “गावात आजवर आंबेडकर समाजमंदिरच नाही. २०२४-२५ मध्ये काम मंजूर होऊन देखील ठेकेदाराने अद्याप हात घातलेला नाही. ही दुर्लक्षाची बाब असून, पुढील आठ दिवसांत काम सुरू न केल्यास आम्ही सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत.”
दरम्यान, या निवेदनामुळे प्रशासनाची झोप उडाली असून ग्रामस्थांच्या रोषामुळे पुढील काही दिवसांत सभामंडपाच्या कामाला गती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 मुख्य ठळक मुद्दे :
मेडद गावात आजवर dr. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर उभारलेले नाही.
सामाजिक न्याय विभागातून २० लाख निधी मंजूर.
टेंडर प्रक्रिया पूर्ण, पण कामाला सुरुवात नाही.
आठ दिवसांत काम न सुरू केल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.




