ताज्या घडामोडी

दौंड योगा स्पोर्ट असोसिएशनतर्फे महिला दिन साजरा; महिला व बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन..


🔥MK NEWS36 

दौंडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा..

दौंड : दौंड योगा स्पोर्ट असोसिएशन व ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक ११ मार्च २०२६ रोजी दौंड येथील गणेश हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला व लहान मुलांनी सहभाग घेतला. महिला दिनानिमित्त संस्थेच्या वतीने महिला नृत्य स्पर्धा, महिला रॅम्प वॉक स्पर्धा, महिला वेशभूषा स्पर्धा तसेच लहान मुलांसाठी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी रवींद्र वाघमोडे व प्रशासकीय अधिकारी विशाल ओहळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित महिला व मुलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले. स्पर्धांमधील विजेत्या महिला व मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या प्रशिक्षक सुजिता असवरे, नंदिता गायकवाड, मनीषा नडगमकर, सोनम बहोत व अंजली सोनवणे यांनी केले. स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सौ. ज्योती धर्माधिकारी, सौ. पल्लवी शिदगणे, सौ. सुषमा गायकवाड व सौ. संयुक्ता वाघमारे यांनी काम पाहिले.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मंगेश चव्हाण व अध्यक्षा सौ. वर्षा चव्हाण यांनी सर्व प्रशिक्षक, पंच, प्रशिक्षणार्थी महिला व स्पर्धकांचे आभार मानले.


Translate »
error: Content is protected !!