ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“शिर्सुफळ ते एमआयडीसी – पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाखाली बेकायदेशीर दारूचा उधाण?”


🔥MK NEWS 36 संपादकीय 

बारामती तालुक्यातील बेकायदेशीर दारू व्यापार : पोलीस स्टेशनच्या छत्रछायेतच?

बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेमकं चाललय तरी काय? एक ना अनेक धंदे, त्यात दारूचं साम्राज्य तर अक्षरशः बिनधास्त उभारलेलं दिसतंय. नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, हा व्यापार फक्त आणि फक्त पोलीस स्टेशनच्या आशीर्वादामुळेच इतक्या राजरोसपणे चालतोय, असा थेट आरोप केला जातोय.

एमआयडीसी परिसरात रोजगारासाठी बाहेरून येणारे मजूर, विशेषत: बिहार आणि इतर राज्यांतील कामगार, हे या बेकायदेशीर धंद्याचे मुख्य ग्राहक ठरले आहेत. व्यसनाधीनता वाढवण्यासाठी छोट्या-मोठ्या ठिकाणी अवैध दारू सहज उपलब्ध होते. कापशी असो वा शिरसुफळ ते पारवडीपर्यंत, कुठेही हाताशी दारू सहज मिळते.

याच्या मागे सरळसरळ हप्ते वसुलीचा खेळ चालतोय, अशी जोरदार चर्चा आहे. “नाव सांगायचं नाही, नाहीतर अडचण येईल” अशा तंबी देऊन व्यापाऱ्यांकडून पैसे उकळले जातात, हेही नागरिकांनी बोलून दाखवलं आहे. जवळपास २५ पेक्षा अधिक ढाबे आणि हॉटेल्स अशा अवैध व्यवसायाचं अड्डं बनले असल्याची माहिती पुढे येतेय.

प्रश्न असा आहे की – हे सर्व पोलीस स्टेशनच्या प्रमुखांच्या नजरेआड होऊच कसं शकतं? जर त्यांना माहिती नसेल, तर त्यांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभं राहतं; आणि जर माहिती असूनही ही बेकायदेशीर दारू विक्री थांबत नसेल, तर मग यातून नेमकं कोणाचं “कल्याण” होतंय?

दारूचा हा काळाबाजार थांबवला नाही तर समाजात व्यसनाधीनतेचं संकट वाढणार, कायदा मोडला जाणार आणि नागरिकांचा विश्वास पोलीस यंत्रणेकडून पूर्णपणे ढासळणार, यात शंका नाही. “या गोष्टीचा छडा लावल्याशिवाय आपण शांत बसणार नाही,” असं नागरिकांनी ठामपणे सांगितलं आहे.

👉 आता बारामती पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की पुन्हा एकदा दुर्लक्ष करणार, हा महत्त्वाचा सवाल निर्माण झालाय.


Translate »
error: Content is protected !!