“एकाच मैदानात दोन नियम — महिंद्राथारवर कारवाईचे तमाशा, आयशर वाहनाचे सत्य लपवले का?”
🔥MK NEWS 36 संपादकीय
वाहतूक विभागाचा “देखावा मोर्चा” – सर्वसामान्यांसाठी कायदा वेगळा, श्रीमंतांसाठी मोकळीक?
बारामती –
वाहतूक विभागाने कायदा-सुव्यवस्था आणि शिस्तप्रियता दाखवण्यासाठी सोशल मीडियावर दोन-दोन पोस्ट टाकल्या. व्हिडिओही टाकले. पण प्रश्न असा – ज्यांच्या नंबर प्लेटवरच गाडीचा नंबर दिसत नाही, त्या गाडीला दंड कुणाला? एवढी गुप्तता का?
महिंद्राची थार गाडी – काळ्याकाचा काढतानाचा व्हिडिओ, फेसबुकवर पोस्ट. पण लगेचच सर्वसामान्यांमध्ये प्रश्न – “ही थार गाडी कोणाची होती, दंड किती झाला?” यावर मौन. त्याचवेळी आयशर गाडी पकडली होती ९ तारखेला, कुठल्या ट्राफिक पोलीसांनी पकडली? कुठल्या झिरो पोलिसांच्या ओळखीने ती सोडून दिली? ह्याचा व्हिडिओ कुठे आहे? की फक्त सामान्यांच्या गाड्यांचेच व्हिडिओ टाकून ‘आम्ही किती शिस्तप्रिय आहोत’ असा दिखावा करायचा?

शहरातील खरे प्रश्न कायम आहेत.
मोता कलेक्शन समोरील ड्रम-बांबूंचा गोंधळ सुटत नाही. कसबा सर्कलसमोर फुटपाथवर शोरूमवाल्यांनी गाड्या लावलेल्या – पण तिथे पोलिसांचा डोळा जात नाही. कारण ती मंडळी “ओळखीची”. मग कायदा फक्त सर्वसामान्यांसाठी का?
“एक कायदा सामान्यांसाठी, दुसरा श्रीमंतांसाठी” – हेच वाहतूक विभागाने आपल्या कारभारातून दाखवून दिलं आहे.
सकाळी ५.३०-६ वाजता उठणाऱ्या शाळा-बसवाल्यांना बोलावून दुसऱ्या दिवशी दंड ठोठावला जातो. पण याच बस वाल्यांना व्हॅन वाहतूक करणाऱ्यांना ज्यावेळेस शाळेला दोन महिने सुट्टी असते त्यावेळेस यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो अशांना सुद्धा दंड आकारला जातो याचा अर्थ काय?ज्यांच्या गाड्या “राज रस” घेऊन सुटतात, त्यांना कोणीही हात लावत नाही.
वाहतूक विभागाला सामान्यांच्या त्रासाशी काही देणंघेणं नाही. त्यांचा उद्देश फक्त फेसबुकवर पोस्ट, व्हिडिओ, आणि देखावा – एवढाच उरला आहे.



