बारामतीत दगडफेक करत तरुणाला डोक्यात मारहाण; झारगडवाडीतील घटनेने परिसरात खळबळ, तालुका पोलिसांत गुन्हा नोंद
🔥MK NEWS36
बारामतीत मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी; ५ जणांवर गुन्हा दाखल
बारामती (प्रतिनिधी):
मागील भांडणाच्या कारणावरून वृद्ध महिलेसह तिच्या मुलाला आणि नातवाला दगडफेक करत बेदम मारहाण केल्याची, तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याCollection ची धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये ५ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल तुकाराम सोलनकर (वय ६० वर्षे, धंदा- मजुरी, रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
✅या आरोपींवर झाला गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१) बापुराव बबन सोलनकर (रा. झारगडवाडी)
२) गौरव गोपिनाथ गोफणे (रा. झारगडवाडी)
३) अरूणा गोपिनाथ गोफणे (रा. झारगडवाडी)
४) गोपिनाथ रावबा गोफणे (रा. झारगडवाडी)
५) धनंजय विठ्ठल देवकाते (रा. पिंपळी, ता. बारामती)
💥दगडफेक आणि बेदम मारहाण
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २७ जून २०२६) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झारगडवाडी येथील फिर्यादी यांच्या घराजवळ ही घटना घडली. मागील भांडणाची कुरापत काढून आरोपी बापुराव सोलनकर याने फिर्यादी मंगल सोलनकर यांना अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने फिर्यादीचा मुलगा प्रवीण तुकाराम सोलनकर व दिराचा नातू सार्थक रूपेश सोलनकर यांच्यावर दगडफेक केली.
या दगडफेकीत प्रवीण सोलनकर यांच्या डोक्यात पाठीमागील बाजूस, डाव्या खांद्यावर, उजव्या हातावर आणि उजव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच नातू सार्थक याच्याही उजव्या हाताला दुखापत झाली आहे.
📍जिवे मारण्याची धमकी
या मारहाणीदरम्यान इतर आरोपी गौरव गोफणे, अरूणा गोफणे, गोपिनाथ गोफणे आणि धनंजय देवकाते यांनीही फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ आणि दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली. या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने बारामती तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पोलीस कारवाई:
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलिसांनी आरोपींविरुद्ध बी एन एस कलम ११८ (१), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दाखल अंमलदार म्हणून महिला पोलीस हवालदार आटोळे यांनी काम पाहिले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बडे करत आहेत.




