“बारामती वाहतूक शाखेचा दंडुका फक्त सामान्यांच्या डोक्यावरच का?”
🔥MK NEWS 36 संपादकीय
कायदा फक्त गोरगरिबांसाठीच का?
बारामती वाहतूक शाखेच्या कारभारावर नागरिकांचा जळजळीत सवाल?
बारामती :
कायद्याची धार फक्त गोरगरिबांवरच? हा प्रश्न कालच्या घटनांनी पुन्हा एकदा पेट घेतला आहे. वाहतूक शाखेच्या शिस्तप्रियतेचे ढोल वाजवले जात असले तरी प्रत्यक्षात काटेकोर पालनाची तलवार फक्त टू-व्हीलर, फोर-व्हीलर अशा सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरच फिरवली जात असल्याचे ज्वलंत उदाहरण उघड झाले.

शोरूम पुढे असणारे थाटात अतिक्रमण..
सीट शेअरिंग करून संसार चालवणाऱ्या गोरगरिबांना अडवून, पावत्या फाडून, लायसन-इन्शुरन्स-पीयूसीची चौकशी करून कायद्याचा धाक दाखवला जातो. पण दुसरीकडे लाखोंचा धंदा करणारे ट्रान्सपोर्ट मालक, ओव्हरलोड गाड्या, आणि रस्त्यावर उघडपणे सरकारी जागेवर ड्रम-बांबू लावून अतिक्रमण करणारी मोठमोठी शोरूम्स – यांच्यावर मात्र गप्पगप्पीची भूमिका!

मोता कलेक्शन समोरील रस्त्यावरील अतिक्रमण..
“गोरगरिबांना कायदा, श्रीमंतांना मोकळीक” अशी परिस्थिती असल्याचा नागरिकांचा आक्रोश आहे.
कालच्याच घटनेत एका टू-व्हीलरवर नंबर प्लेट नसल्याने तडक पावती काढण्यात आली. प्रश्न असा की, एवढा काटेकोर कायदा जर गोरगरिबांवर चालतो, तर मग मोठ्या ट्रान्सपोर्ट लॉबी, शोरूम्स आणि ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई का नाही?
सरकारी फुटपाथवर उभ्या टू-व्हीलर-फोर-व्हीलर शोरूम गाड्या, अतिक्रमण, नियमबाह्य ट्रान्सपोर्ट व्यवसाय – याकडे वाहतूक शाखा मुद्दाम डोळेझाक करते का?
नागरिकांचा संशय गडद होत चालला आहे :
👉 “कायदा म्हणजे फक्त गरीबांना धाक दाखवायचा डंडा आणि श्रीमंतांना ठेवायचा थाट?”




