केंद्र नाईक-प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच घोटाळा होतात का?
🔥MK NEWS 36 संपादकीय
होमगार्ड विभागातील भ्रष्टाचाराचा भंडाफोड : पुण्यात मृत व्यक्तींच्या नावावर पेमेंट? वरिष्ठ ऑफिसच खरा सूत्रधार?
होमगार्ड विभागात दिवसेंदिवस नवनवीन भ्रष्टाचार उघड होत आहेत. पुणे मध्ये तर कथितरित्या मृत व्यक्तींच्या नावावर पेमेंट काढल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. जर हे खरे असेल तर एवढ्या मोठ्या घोटाळ्याकडे कानाडोळा करणे म्हणजे थेट भ्रष्टाचाराला पाठबळ देणेच होय.
यामागे फक्त समादेशक जबाबदार नसून पुणे येथील वरिष्ठ ऑफिसमधील केंद्र नाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमतानेच हा खेळ रचला जातो, असा होमगार्ड जवानांचा आरोप आहे. कारण एवढी मोठी कागदपत्रे घोडे नाचवणे व करून, पीडीएफ याद्या बनवून, त्या जिल्ह्याला पोहोचवणे हे फक्त एकट्या समादेशकाच्या हाताबाहेरचे काम आहे.
मागील काळात आठवी, चौथी, दहावी असे विविध शिक्षणाच्या आधारे होमगार्ड भरती होत असे. कायद्याचा पुरेसा अभ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असतो आणि त्यामुळेच हा संपूर्ण घोटाळा त्यांच्या भोवती फिरतो, अशी चर्चा होमगार्डमध्ये जोर धरत आहे.
राजगुरुनगर पथकातील एका महिला कर्मचाऱ्यावर अन्याय झाल्याचे गंभीर आरोप आहेत. माहितीच्या अधिकाराखाली अनेक वेळा मागणी करूनही माहिती लपवली गेली का?, यातूनच वरिष्ठ ऑफिसची संगनमत व हातमिळवणी स्पष्ट होते का?असे जवानांचे म्हणणे आहे.
प्रत्येक तालुक्यात समादेशकांवर अन्यायकारक कारभाराचे आरोप होत आहेत, परंतु त्यामागील खरे सूत्रधार पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीच असल्याचा संशय अधिक बळकट होत आहे.
म्हणूनच जवानांची मागणी आहे की — केंद्र नाईक व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर अंतर्गत यंत्रणे मार्फत सखोल चौकशी व्हावी. कारण घोटाळ्यांचे प्रायोजक व आधारस्तंभ कोण, हे उघड होणे आता अत्यावश्यक ठरले आहे.




