राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेसाठी चार मान्यवर यांची नियुक्ती…
अँड.उज्वल निकम, हर्षवर्धन श्रृंगला, सी. सदानंदन मास्टर आणि डॉ. मीनाक्षी जैन यांची राज्यसभेसाठी निवड….
नवी दिल्ली – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संविधानाच्या अनुच्छेद ८० नुसार चार मान्यवरांना राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. या निवडींमुळे राज्यसभेतील वैविध्यपूर्ण अनुभव, ज्ञान आणि सामाजिक योगदानाचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे.
निवड झालेले सदस्य पुढीलप्रमाणे:
1. उज्वल निकम – देशातील सुप्रसिद्ध विशेष सरकारी वकील. १९९३ मुंबई बॉम्बस्फोट, प्रशांत साखरकर खून, औरंगाबाद दहशतवाद प्रकरण यांसारख्या अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची यशस्वी बाजू मांडलेली आहे.
2. सी. सदानंदन मास्टर – केरळ राज्यातील प्रसिद्ध समाजसेवक. मागासवर्गीय आणि आदिवासी समाजासाठी अनेक दशकांपासून कार्यरत आहेत.
3. हर्षवर्धन श्रृंगला – भारताचे माजी परराष्ट्र सचिव तसेच बांगलादेश व अमेरिका येथील भारताचे राजदूत राहिलेले वरिष्ठ आयएफएस अधिकारी.
4. डॉ. मीनाक्षी जैन – इतिहास संशोधक, लेखिका आणि शिक्षिका. भारतीय परंपरा, संस्कृती व इतिहास यावर अभ्यासपूर्ण लेखन करणाऱ्या विदुषी.
या निवडी देशाच्या विविध क्षेत्रातील उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरव देणाऱ्या असून, संसदेच्या सभागृहात त्यांचे अनुभव आणि विचार महत्त्वपूर्ण ठरणार आहेत…




