“जयंत पाटील पायउतार, शशिकांत शिंदे नव्या धुरंधराची निवड”
2633 दिवसांची निष्ठेची कथा, जयंत पाटील याचा भावूक निरोप साहेबांसोबत शेवटपर्यत राहिलो – जयंत पाटील
—
📰 जयंत पाटील यांचा भावूक राजीनामा – शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटात आज मोठा बदल झाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपला राजीनामा जाहीर केला. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी भावनिक भाषण करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नावे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आली.
राजीनामा देताना जयंत पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला, सरकारवर घणाघाती टीका केली आणि निष्ठेचा पायाच कधीही हलवला नसल्याचं ठामपणे सांगितलं.
—
🔹 ठळक मुद्दे: जयंत पाटील यांचे भाषण..
2633 दिवस अध्यक्षपदाची जबाबदारी – जयंत पाटील यांनी सांगितलं की, “मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष होतो. या काळात मी एकही सुट्टी घेतली नाही, हे मी बायकोलाही सांगितलं होतं.”
भावूक भाषणात भावना व्यक्त – “सगळे सहकारी गेले, तरी मी साहेबांसोबत निष्ठेने उभा राहिलो,” असे म्हणत त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा अधोरेखित केली.
सरकारवर टीका – “हिंदी सक्तीचा प्रयत्न मुंबई महापालिकेत एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी झाला. शेतकरी बैलाऐवजी स्वतः नांगर ओढत असल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळतंय,” असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.
पक्षाची वाटचाल – “मधल्या काळात पक्ष फुटला, पण आम्ही पॅनिक न होता निर्णय घेतला. विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेचा प्रस्तावही दिला. लोकसभेत 10 जागा लढवल्या आणि 8 खासदार निवडून आले.”
‘साहेबांचा निर्णय अंतिम’ – “साहेब निर्णय घेतात ते विचारपूर्वक घेतात. आता योग्य वेळ आहे की मी बाजूला व्हावं, साहेबांनी नवीन अध्यक्ष निवडावा,” असे पाटील म्हणाले.
राजेश टोपे यांच्या पराभवाबाबत खेद – “टोपेंचं काम कुणीही विसरणार नाही. पण मतदारसंघातील लोक कसे विसरले, हेच कळत नाही.”
पारिवार संवाद यात्रेची आठवण – “7,600 किमी प्रवास आम्ही केला. जिथे आम्ही निवडणूक लढवत नव्हतो, तिथेही पोहोचलो. शरद पवार यांचं नाव घेतलं की महाराष्ट्रात कुठल्याही गावात 50 कार्यकर्ते सहज मिळतात.”
अमोल मिटकरी गेले तरी अमोल कोल्हे राहिले – “दोन अमोल माझ्यासोबत होते, एक कोल्हे अजूनही सोबत आहेत, दुसरे गेले.”
✨ नवीन नेतृत्वाची घोषणा:
बैठकीनंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचं नाव जाहीर करत नव्या अध्यायाची सुरुवात केली. शिंदे हे साताऱ्याचे आमदार असून, ते कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि आगामी महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची मानली जात आहे…



