ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनतर्फे 9 ते 11 जानेवारीला संक्रांती उत्सव..!
🔥MK NEWS 36
मकर संक्रांतीनिमित्त बारामतीत भव्य शॉपिंग व फूड फेस्टिवलचे आयोजन..!
बारामती|
परंपरेचा गोडवा, उत्सवाची रंगत आणि खरेदीचा मनमुराद आनंद एकत्र अनुभवण्याची संधी बारामतीकरांना मिळणार आहे. येत्या मकर संक्रांतीनिमित्त ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशन यांच्या वतीने “मकर संक्रांती शॉपिंग & फूड फेस्टिवल 2026” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दि. 9, 10 व 11 जानेवारी 2026 रोजी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे.
मकर संक्रांत हा सण सामाजिक एकोपा, गोड बोलण्याची परंपरा आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. याच भावनेतून या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून, सहपरिवार येऊन खरेदी, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक आनंद एकाच ठिकाणी अनुभवता येणार आहे.
या फेस्टिवलमध्ये तिळगुळाच्या पारंपरिक गोड पदार्थांपासून ते विविध चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानी, तसेच कपडे, दागिने, फॅशन अॅक्सेसरीज, गृहउपयोगी वस्तू, हस्तकला वस्तू आदींची आकर्षक खरेदी उपलब्ध असणार आहे. महिलांसाठी, युवकांसाठी आणि लहान मुलांसाठी खास स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले असून, एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
खरेदी आणि खाद्यसंस्कृतीसोबतच उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी संगीत, सणाचा जल्लोष आणि आनंदी वातावरण यांचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हा फेस्टिवल केवळ खरेदीपुरता मर्यादित न राहता, एक संपूर्ण कौटुंबिक उत्सव ठरणार आहे.
ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशन यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिक, महिला उद्योजक आणि लघुउद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्याचे व्यासपीठ मिळणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आठवणींना सुवर्णस्पर्श देणारा हा उत्सव चुकवू नका, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
परंपरा, स्वाद आणि खरेदीचा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन येथे 9 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान अवश्य भेट द्यावी, असे आयोजकांनी कळविले आहे.




