अधिकारी निलंबन व सकल चौकशीची मागणी तीव्र; MK NEWS 36 लढा सुरूच ठेवणार..!
🔥MK NEWS36
फॅक्टरी मालक राजकीय जवळचा म्हणून कारवाई टळतेय का? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा?
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती |
बारामती तालुक्यातील कटफळ येथील केमिकल फॅक्टरीवरील तथाकथित ‘रेड’ प्रकरण आता केवळ प्रशासकीय हलगर्जीपणापुरते मर्यादित न राहता प्रशासन–राजकीय संगनमताच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एक ना अनेक नियमबाह्य बाबी उघड होऊनही संबंधित अधिकारी आजतागायत शांत का आहेत? हा प्रश्न आता सामान्य नागरिकांपासून कायदेपंडितांपर्यंत सर्वांनाच अस्वस्थ करत आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेल्या सोडियम हायड्रॉक्साइड (Caustic Soda) या केमिकलचा वापर. हा पदार्थ त्वचा, डोळे, श्वसनमार्ग यांसाठी अतिशय धोकादायक असून तो मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे का? त्यासाठी आवश्यक परवाने, साठवणूक, सुरक्षा व्यवस्था व तांत्रिक पात्रता आहे का? याबाबत प्रशासनाने ठोस उत्तर देणे अपेक्षित होते. मात्र येथे तपासाऐवजी मौन दिसून येत आहे.
रेड प्रक्रियेतील त्रुटी तर अधिकच धक्कादायक आहेत.
🔴 पंचांच्या सह्या खोट्या असल्याचे पुरावे समोर येत आहेत
🔴 रेडच्या वेळी दुसरा पंच प्रत्यक्ष उपस्थितच नव्हता?
🔴 फक्त नावापुरता, नामधारी पंच दाखवून पंचनामा तयार करण्यात आल्याचा संशय
अशा परिस्थितीत हा पंचनामा कायदेशीर कसा ठरू शकतो?
🔴 त्यांचे परवाने व शिक्षण मालकाचे याची कागदपत्रे तपासले आहेत का?
की मग हे असं म्हणायचं का —
“रेड करणारा मीच, मिटवणारा मीच आणि शेवटी सेटलमेंट करणारा मीच?”
जर हे खरे असेल, तर ही बाब केवळ प्रशासकीय चूक नसून थेट गुन्हेगारी स्वरूपाची ठरते. कारण अशा प्रकारे नियम डावलून, गंभीर केमिकल हाताळणीवर डोळेझाक केल्यास लोकांच्या जीवाशी सरळसरळ खेळ केला जातो.
या संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे,
👉 संबंधित फॅक्टरीचा मालक हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अत्यंत जवळचा असल्याची चर्चा
👉 त्यामुळेच अधिकारी “कार्यदक्ष” न राहता राजकीय मर्जीप्रमाणे काम करत आहेत का?
👉 “बारामतीकर माझे” हे वाक्य फक्त राजकीय भाषणापुरते मर्यादित आहे का, की प्रत्यक्षात बारामतीकरांच्या जीवाची किंमत शून्य आहे?
जर अधिकारी स्वतंत्रपणे, निर्भयपणे काम करत नसतील, तर ते अधिकारी जनतेसाठी आहेत की राजकीय दबावासाठी? असा थेट सवाल उपस्थित होतो.
MK NEWS 36 स्पष्ट शब्दांत सांगितले —
🔹 जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत नाही
🔹 जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सकल, स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होत नाही
🔹 जोपर्यंत सर्व परवाने, केमिकल वापर, पंचनामा व रेड प्रक्रिया जनतेसमोर येत नाही
तोपर्यंत हे प्रकरण आम्ही सोडून देणार नाही.
पुरावे, कागदपत्रे, साक्षीदार आणि प्रश्न — सर्व काही एक-एक करून जनतेसमोर आणले जाईल.
हा प्रश्न केवळ एका फॅक्टरीचा नाही,
हा प्रश्न बारामतीकरांच्या जीवाचा आहे.
वाचत राहा – MK NEWS 36
सत्याच्या बाजूने, निर्भय पत्रकारितेसाठी.




