खिसा गरम, नियम थंड? बारामती कटफळ केमिकल फॅक्टरी प्रकरणात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप?
🔥MK NEWS36
नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच? बारामती केमिकल प्रकरणात अजित पवारही गप्प — कुणाला वाचवण्यासाठी हे मौन?
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती बारामती येथील कटफळ केमिकल फॅक्टरी रेड प्रकरण : प्रशासन, मालक आणि अजित पवारांचे मौन नेमकं कुणासाठी? नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे का?
बारामती येथील कटफळ येथील केमिकल फॅक्टरीवर झालेल्या रेडनंतर एक धक्कादायक बाब समोर येत आहे ती म्हणजे प्रशासन, फॅक्टरी मालक आणि स्थानिक राजकीय नेतृत्व यांचे संशयास्पद मौन. रेडमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्याची चर्चा असताना देखील कुठलीही ठोस कारवाई, खुलासा किंवा जबाबदारी स्वीकारण्याची तयारी कुणाकडूनही दिसून येत नाही.
या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे नागरिकांच्या जीवाशी थेट संबंधित केमिकल्सचा वापर. वापरण्यात येणारी केमिकल्स अधिकृत परवान्याने खरेदी केली जातात का? त्या केमिकल्सचे साठवण, वाहतूक आणि वापर कायद्याच्या चौकटीत आहे का? याची उत्तरे देण्यास प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रेड झाल्यानंतर फॅक्टरीचा मालक गप्प, प्रशासन गप्प आणि विशेष म्हणजे बारामतीचे आमदार अजित पवारही पूर्णतः मौनात. “बारामती हा माझा परिवार आहे” असे सातत्याने सांगणारे नेते आज या परिवाराच्या आरोग्याशी व जीवाशी संबंधित इतक्या गंभीर प्रकरणावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, ही बाब नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत आहे.
नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे —
हे मौन एखाद्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी आहे का?
की नियमबाह्य काम करणाऱ्या फॅक्टरीला पाठीशी घालण्यासाठी?
या प्रकरणात सहभागी असलेले काही अधिकारी हे ‘भ्रष्ट कर्मचारी’ ठरत असल्याचा आरोपही उघडपणे होत आहे. “स्वतःचा खिसा गरम झाला की काम संपलं, मग नागरिक जगले काय किंवा मेले काय?” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाचे वर्तन पाहता नागरिकांच्या जीवाला किंमत उरलेली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फॅक्टरी मालक गप्प राहणे हे समजण्यासारखे आहे, कारण नियमबाह्य काम असल्याचा संशय त्याच्यावर आहे. मात्र, लोकांनी वर्षानुवर्षे विश्वास टाकलेल्या लोकप्रतिनिधीकडूनही जर उत्तर मिळत नसेल, तर हा विश्वास तुटायचा नाही तर काय?
आज बारामतीत प्रत्येक नागरिक एकच प्रश्न विचारतो आहे —
अजित पवार या प्रकरणात ठोस भूमिका घेणार का?
कारवाई होणार की हे प्रकरणही फाईलमध्ये गाडले जाणार?
कारण हा विषय राजकारणाचा नसून थेट नागरिकांच्या जीवाचा आहे. आणि जर यावरही मौन ठेवले गेले, तर उद्या नागरिकांना प्रश्न विचारण्याचाही अधिकार शिल्लक राहील का, हाच खरा सवाल आहे.
वाचत रहा MK NEWS36 ..!




