ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

अपघाताचा धोका टळला; MK NEWS 36 च्या बातम्यांनंतर प्रशासन जागे!


🔥 MK NEWS 36 संपादकीय 

एम.के. न्यूजचा इम्पॅक्ट : देशमुख चौक ते महात्मा फुले चौक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

बारामती │ देशमुख चौक ते महात्मा फुले चौक या मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता वाढली होती. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता जीवघेणा ठरत होता.

एम.के. न्यूजने सातत्याने या प्रश्नावर बातम्या प्रसिद्ध केल्या. लोकांच्या वेदना आणि अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केल्यानंतर अखेर नगरपालिकेचे प्रशासन जागे झाले आणि तातडीने खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

काम सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी एम.के. न्यूजचे मनापासून आभार मानले आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, “एम.के. न्यूजने जर आवाज उठवला नसता तर हा प्रश्न आणखी वाढला असता आणि एखाद्याचा जीव गेला असता.”

एम.के. न्यूजची भूमिका केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित नसून, सामाजिक जबाबदारी स्वीकारून समाजकारण करण्याची आहे. जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.

बारामती परिसरातही असेच अनेक प्रश्न आहेत. नागरिकांनी ते मांडले तर एम.के. न्यूज पुढाकार घेऊन त्यावर प्रशासनाचे लक्ष वेधून घेईल, अशी ग्वाही एम.के. न्यूजकडून देण्यात आली आहे.

👉 लोकांच्या हितासाठी आवाज उठवणे आणि समस्या सोडवून घेणे हेच एम.के. न्यूजचे ध्येय आहे.


Translate »
error: Content is protected !!