ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गौरव, कदम–निलेश च्या जोडगोळीच्या साथीने गुटखा व्यापार फोफावला?


🔥MK NEWS 36 संपादकीय 

📰 बारामतीत गुटख्याचा राजरोस व्यापार – पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही?

बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत एक ना अनेक बेकायदेशीर धंदे धडाक्यात सुरू असल्याची संतापजनक चर्चा नागरिकांत आहे. महाराष्ट्र सरकारने कडक बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री येथे मात्र उघडपणे, राजरोसपणे सुरू असून, नागरिकांचा ठाम आरोप आहे की हा व्यवसाय “आशीर्वादाशिवाय” अशक्य आहे.

गौरव कदम, गांधी आदींची नावं गुटखा विक्रीत पुढे येत असून, हे फक्त काही उदाहरणं आहेत. या पाठीशी कोणाचे छुपे आशीर्वाद आहेत, हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांचा संशय स्पष्ट आहे की, तालुक्यातील पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा डीलर व डिस्ट्रीब्युटर व्यवसाय करणे अशक्य आहे.

गुटखा विक्रीचा हा साखळी व्यवसाय आता “परंपरा” झाल्यासारखा दिसत असून, बारामतीत गुटखा डीलर खुलेआम व्यवहार करतात. गौरव ,कदम यांचे नाव तर थेट सगळ्यात मोठ्या विक्रेत्यांपैकी घेतले जात असून, निलेश यांच्या “साथी”शिवाय आणि “कल्याण”शिवाय हा सारा धंदा शक्य नाही, असा नागरिकांचा ठाम विश्वास आहे.

👉 महाराष्ट्रात गुटखा विक्री ही बेकायदेशीर आहे.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत कारवाईची तरतूद आहे.

भारतीय दंड संहिता (IPC) कलम २७२, २७३ अंतर्गत आरोग्यास हानिकारक अन्न विक्री हा गुन्हा मानला जातो.

अन्न सुरक्षा आयुक्तांना (कलम ३०(२)(अ)) उत्पादन, साठवण, वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचा अधिकार आहे.

तरीही, या सर्व कायद्यांना धाब्यावर बसवून बारामती तालुक्यात गुटख्याची उघडपणे विक्री सुरू आहे. “गुटखा माफियांचा” हा धंदा आणि त्यामागची छुपी साथ उघड करणं, हे प्रशासन आणि पोलीस यांची खरी कसोटी ठरणार आहे.

📌 नागरिकांचा रोष:
“गुटखा विक्री पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. रोजच्या रोज दिसणारा हा उघड धंदा जर थांबत नसेल, तर यामागे कोण आहे हे प्रशासनाने जाहीर करावे,” अशी मागणी लोकांतून जोरदार होत आहे.


Translate »
error: Content is protected !!