ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

संध्याकाळच्या भारनियमनाविरोधात दौंड-शिरूरमध्ये उद्या आमरण उपोषण..!


🔥MK NEWS36 

दौंड-शिरूर तालुक्यातील वीज समस्येविरोधात उद्या आमरण उपोषण

दौंड/शिरूर (प्रतिनिधी): दौंड व शिरूर तालुक्यातील वाढत्या वीज भारनियमनाच्या समस्येविरोधात उद्या दि. 04 मे 2026 रोजी आमरण उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपोषणाला तालुक्यातील सर्व विद्युत ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सध्या संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच व्यावसायिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असून, कृषी पंपांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे भारनियमन हे संध्याकाळच्या ऐवजी सकाळ किंवा दुपारच्या सत्रात करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

तसेच केडगाव, दापोडी, बोरीपार्धी, पाटस, यवत आदी गावांमधील डीपी 24 तास वीजपुरवठ्याशी जोडण्याबाबत ठोस पावले उचलावीत, तसेच शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या उपोषणाला आधीच हजारो नागरिकांनी पाठिंबा जाहीर केला असून, “घरी बसून न्याय मिळणार नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल,” असा ठाम संदेश आयोजकांनी दिला आहे. हे आंदोलन अहिंसा व गांधीगिरीच्या मार्गाने करण्यात येणार असून, संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत उपोषण पार पडणार आहे.

या उपोषणाचे नेतृत्व श्री. अनिल बापूराव नेवसे व श्री. प्रदेश ज्ञानदेव शेलार करणार आहेत. “जागो ग्राहक जागो” या घोषवाक्यासह नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Translate »
error: Content is protected !!