युवक कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम स्तुत्य – दुर्गादेवी जगदाळे
🔥MK NEWS36
युवक कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम स्तुत्य – दुर्गादेवी जगदाळे
दौंड, दि. १ मे २०२६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग, दौंड तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला युवक कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम हा स्तुत्य असून असे रोजगाराभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जावेत, असे मत दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी व्यक्त केले.
बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञान संकल्प सामाजिक संस्था, दौंड यांच्या सहकार्याने संविधान चौक, सरपंच वस्ती येथील आयडल अकादमीमध्ये या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बी. वाय. जगताप व ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांनी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गुरुमुख दादा नारंग, कार्याध्यक्ष हर्षदा वूड, युवक अध्यक्ष निखिल स्वामी, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जालिंदर सोनवणे, संविधान स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक सोनवणे तसेच बौद्धिस्ट नालंदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रा. भिमराव मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बी. वाय. जगताप यांनी प्रस्ताविक भाषणात भविष्यात सुमारे ५००० युवकांना करिअर डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल खाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सदाशिव रणदिवे यांनी मानले.
या प्रशिक्षण उपक्रमात सुमारे ५० युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.




