ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

बारामती एमआयडीसीत लोन प्रकरणातून मारहाण व शिवीगाळ; दोन्ही बाजूंनी पोलिसात गुन्हे दाखल..!


🔥MK NEWS 36 

बारामती एमआयडीसीतील लोन ऑफिसमध्ये दोघांमध्ये मारहाण व जातीय शिवीगाळ; परस्परांवर गुन्हे दाखल

बारामती प्रतिनिधी │ दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी बारामती एमआयडीसीतील सुभद्रा मॉल येथील ‘कि आँफ लोन ऑफिस’मध्ये झालेल्या वादातून दोन्ही पक्षांत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि धमकीप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिला गुन्हा क्र. 418/2025 भादंवि कलम 115(2), 352, 351(2)(3), 3(5) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा कलम 3(1)(r)(s) अंतर्गत दाखल झाला आहे.

या प्रकरणात फिर्यादी आनंद हरिदास भोसले (वय 32, धंदा – लोन ॲडव्हायझर, रा. तांबेनगर, बारामती, मुळ रा. फोंडशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
लोन मंजूर न झाल्याच्या कारणावरून आरोपी गणेश रामचंद्र वाघमोडे (रा. फोंडशिरस) व त्याचा साथीदार अक्षय ठोंबरे (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांनी कार्यालयात येऊन जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली आणि “तुला कापून टाकीन” अशी धमकी दिली.

या प्रकरणाचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून नोंद  अमोल कदम यांनी घेतली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दुसऱ्या बाजूने गणेश रामचंद्र वाघमोडे (वय 38, व्यवसाय – शेती, रा. फोंडशिरस) यांनीही फिर्याद दाखल केली आहे.
या अनुषंगाने गुन्हा क्र. 419/2025 भादंवि कलम 119(1), 115(2), 352, 351(2)(3) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे.

वाघमोडे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की,
त्यांच्यात जुन्या कर्ज प्रकरणावरून बोलणे सुरू असताना आनंद भोसले यांनी अक्षय ठोंबरे यास हाताने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच त्याच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतली. त्यानंतर स्वतः वाघमोडे यांनाही मारहाण करून त्यांच्या खिशातील दीड लाख रुपये काढून घेतले व “जर तू तक्रार केलीस, तर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीन” अशी धमकी दिली.

या तक्रारीची नोंद पो.हवा. खारतोडे यांनी केली असून तपासाची जबाबदारी पो.हवा. दळवी . यांच्याकडे आहे.

दोन्ही तक्रारींमुळे या घटनेला आता क्रॉस कंप्लेंटचे स्वरूप आले असून पोलिस तपासानंतरच या वादाचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
बारामती एमआयडीसी परिसरात घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


Translate »
error: Content is protected !!