ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“काळी जादू प्रकरणात बारामती कोर्टाचा कडक निर्णय; आरोपीस 4 वर्षांची शिक्षा”


🔥MK NEWS36 

बारामती सेशन कोर्टाचा मोठा निकाल; काळी जादू प्रकरणातील आरोपीला शिक्षा..!

बारामती (प्रतिनिधी) : बारामती तालुका पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील गाजलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/2024 प्रकरणात आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, बारामती यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी मिलिंद मदन जाधव (वय 50, रा. धोपावे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याला न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात चाललेल्या सेशन केस क्रमांक 237/2024 मध्ये सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी केला असून, सरकारी अभियोक्ता ज्ञानदेव शिंगाडे यांनी बाजू मांडली.

न्यायालयाने आरोपीस भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अंतर्गत दोषी धरत दोन वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे. तसेच महाराष्ट्र काळी जादू अधिनियम 2013 च्या कलम 2(1)(B) व 3 अंतर्गत दोषी ठरवत चार वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस हवालदार रेणुका पवार, तसेच सेशन कोर्ट पैरवी अंमलदार जीपीएसआय कसपटे व एएसआय कवडे यांनी सहकार्य केले. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी काम पाहिले.

या निकालामुळे काळी जादू व अंधश्रद्धा विरोधातील कारवाईला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


Translate »
error: Content is protected !!