ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

“शिक्षा भोगूनही सुधारला नाही; बारामतीत १० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या सराईत आरोपीला अटक.”


🔥MK NEWS36 

बारामतीत १० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधम शेजारी जेरबंद..!

१० वर्षांपूर्वी बलात्काराची शिक्षा भोगलेला आरोपी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात; बारामती पोलिसांची ‘झिरो टॉलरन्स’ कारवाई..!

बारामती(प्रतिनिधी):

एका १० वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी हसन शमशुध्दीन झारे उर्फ राजू (वय ५२, रा. अनंतआशा नगर) याला अटक केली असून, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षांची सक्तमजुरी भोगली आहे.

🗞️नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हसन हा फिर्यादीच्या शेजारीच राहतो. ओळखीचा गैरफायदा घेत त्याने १० वर्षांच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि आपल्या घरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. एवढेच नव्हे तर कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तपासादरम्यान, या आरोपीने आणखी एका अल्पवयीन मुलीसोबतही अशाच प्रकारचे गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे.

आरोपीस अटक केलेले…!

🚨पोलिसांचा थरारक पाठलाग..!

दिनांक ५ एप्रिल रोजी फिर्यादी महिला तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचताच आरोपीने घरातून पलायन केले होते. मात्र, बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तांत्रिक पुरावे आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केला. आरोपी शहर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी सापळा रचून त्याला बारामती एस.टी. स्टँड परिसरातून बेड्या ठोकल्या.

💥विकृत मनोवृत्तीची पुनरावृत्ती

आरोपी हसन झारे याचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत विदारक आहे. २००९ मध्ये त्याने एका १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला होता. त्या गुन्ह्यात त्याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला नसल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

“महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. अशा विकृत गुन्हेगारांविरुद्ध बारामती पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण आहे.”

— श्रीशैल चिवडशेट्टी, प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन

🚨या पथकाने केली कारवाई..!

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, महिला पोलीस उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख, हवालदार सुलतान डांगे, अमोल देवकाते, ऋषिकेश जाधव, राहुल बडे आणि गौरव ठोंबरे यांच्या पथकाने केली.

🙏पालकांनो सावधान!

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पालकांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत:

मुलांना ‘गुड टच-बॅड टच’ मधील फरक समजावून सांगा.

अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीने दिलेल्या चॉकलेट, भेटवस्तूंचे आमिष न पत्करण्याबाबत मुलांना शिक्षण द्या.

मुलांशी सतत संवाद ठेवा आणि त्यांच्या वागणुकीतील बदलांकडे लक्ष द्या.


Translate »
error: Content is protected !!