ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जनशक्ती संघटनेतर्फे सत्कार..!


🔥MK NEWS36 

जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचा कामगार मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार
बारामती, प्रतिनिधी :
बारामती येथे जनशक्ती कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगार मेळावा तसेच बारामती नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि कंत्राटी कामगारांच्या उपोषण काळात पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक राजेंद्र सोनवणे, नवनाथ बल्लाळ, आरती गव्हाळे, निलेश इंगुले यांच्यासह ॲड. तुषार ओहोळ, ॲड. स्वरूप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण, राणी नवले, स्नेहा अहिवळे, अमोल कुलट तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा सत्कार जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमावेळी संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, नगरसेवक आरती शेंडगे, नवनाथ बल्लाळ, ॲड. तुषार ओव्हाळ आणि राणी नवले यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उपस्थित नगरसेवकांनी कंत्राटी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला.
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कंत्राटी कामगारांना दरमहा पहिल्या आठवड्यात वेतन देण्यात येईल तसेच उपोषणावेळी कामगारांनी मांडलेल्या दहा मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले की, जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी सातत्याने लढत राहील. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Translate »
error: Content is protected !!