नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रशिक्षण शिबिर – मतचोरीचे मशीनद्वारे प्रात्यक्षिक
🔥MK NEWS 36
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर, जयंत पाटील यांच्या उशिरा येण्यावरून चर्चांना उधाण..!
नाशिक (प्रतिनिधी) :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने रविवारी नाशिक येथे पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात निवडणुकांमध्ये मतांची चोरी कशी केली जाते याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) दाखवण्यात आले. पक्ष कार्यकर्त्यांना या प्रात्यक्षिकातून निवडणूक प्रक्रियेत घडणाऱ्या अनियमिततेची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिराची सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. मात्र ते उशिरा आल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. “पाटील साहेब नाराज आहेत का?”, “उशीर का झाला?” अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थितांमध्ये फिरू लागले. त्यांच्या उशिरा येण्यावरून कार्यक्रमस्थळी काही काळ वेगळीच खुमासदार चर्चा सुरू झाली.
दरम्यान, पाटील साहेबांनी शिबिरात उशिरा का होईना पण सहभाग नोंदवला. त्यांनी पक्ष बांधणी, संघटनात्मक बळकटी आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्षातील ऐक्य, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला.
या शिबिरात प्रदेशातील विविध विभागांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. मत चोरीच्या प्रात्यक्षिकामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. त्याचबरोबर जयंत पाटील यांच्या उशिरा येण्यावरून झालेल्या चर्चेमुळे संपूर्ण शिबिर अधिकच रंगतदार झाले.




