क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“गॅसचा धंदा – मृत्यूशी खेळ” : डोर्लेवाडी,झारगडवाडी – माळेगावात माफियांचा उच्छाद, प्रशासन बधिर!


MK NEWS 36 /संपादकीय

🚨 माळेगाव-डोर्लेवाडी व झारगडवाडी गॅस माफियांचा उच्छाद – प्रशासन गाढ झोपेत, नागरिकांचा जीव धोक्यात!

BARAMATI:डोर्लेवाडी, झारगडवाडी व माळेगाव परिसरात घरगुती गॅस रिफिलिंगचा बेकायदेशीर धंदा दिवसेंदिवस वाढत असून, पोलिस आणि प्रशासन यांच्याकडून मात्र अजूनही कारवाईचा केवळ दिखावा सुद्धा सुरू नाही सातत्याने बातम्या लावूनही प्रत्यक्ष हालचाल होत नाही, त्यामुळे गॅस माफियांना अक्षरशः मोकळा रस्ता मिळाला आहे.

डोर्लेवाडी व झारगडवाडी गॅस माफिया
डोर्लेवाडी नाळे, हिवरकर आणि ब्रुंगले हे तीन कुख्यात गॅस माफिया या धंद्याचा सपाटा लावत आहेत. घरगुती गॅस टाक्यांमधील रिफिलिंग करून काळ्या बाजारात विक्री केली जाते. सुरक्षिततेच्या नियमांची पायमल्ली करून हा धंदा राबवला जात असल्याने कोणत्याही क्षणी भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.

माळेगावची गॅस माफिया राजधानी
माळेगावात तर परिस्थिती अधिक भयानक आहे. बागडबिल्ले, बागल आणि राऊत हे मोठे गॅस माफिया खुलेआम व्यवसाय करत आहेत. स्थानिक गॅस एजन्सीच या गॅस माफियांना “भरलेल्या टाक्यांचे कच्चे मटेरियल” पुरवते. एजन्सीला टाक्या विकण्याऐवजी त्यांचा पुरवठा काळ्या बाजारात केल्याने, एजन्सी आणि माफिया दोघांचाही नफा हा लाखोमध्ये पोहोचत आहे.

जनतेचा जीव धोक्यात – प्रशासनाचे मौन
या बेकायदेशीर धंद्यात अग्निसुरक्षेचे कुठलेही नियम पाळले जात नाहीत. वस्तीमध्ये गॅस टाक्या भरल्या जात असल्याने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ कधीही येऊ शकते. तरीही पोलिस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि गॅस कंपन्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांची भूमिका संशयास्पद दिसते.

जाहीर आवाहन
गॅस माफियांच्या या बेकायदेशीर साम्राज्यावर तात्काळ बंदी आणून, संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा ही निष्क्रियता भविष्यात गंभीर दुर्घटनांना आमंत्रण देईल.


Translate »
error: Content is protected !!