ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

पाउस वेळेवर पडत नसल्यानें शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यात लाईट ची अशी बोंब त्यामुळे सद्या शेतकरी वर्गात नाराजीचा सुर निघताना पाहत आहे


🔥MK NEWS 36 

लाईन फॉल्ट पाच गावास वेठीस, विद्युत वितरण कंपनीचा भोगळ कारभार
सचिन आटोळे
दौंड(विशेष प्रतिनिधी) भिगवन च्या फिडर मधुन दौड च्या पूर्व भागातील मुख्यतः येणाऱ्या प्रमुख पाच गावे रावणगाव, खडकी नंदादेवी चिंचोली, मळदचा काही भाग लोणारवाडी रात्री म्हणजे ऐन गणपती विसजर्नच्या बरोबर आदल्या दिवशी लाईट गेल्याने गणेश भक्त नाराज झाले आहेत त्यामूळे पुन्हा एकदा विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कितीतरी वेळा भिगवन फिडर च्या लगतची विद्युत वाहिनी म्हणजे जी अंडरग्राउंड आहे ती चा अनेक वेळा फॉल्ट निघत आहेत.

सार्वजनिक विभागाने अनेक वेळा सूचना देऊनही विद्युत वितरण कंपनी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करणारी व्यवस्था पाहिजे परंतु विद्युत वितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने अनेक व्यावसायिक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी यावर कायमचा तोडगा काढणे व लक्ष देण्याची गरज असताना हा विषय वरिष्ठ पातळीवर का नेला जात नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. दौंड चे आमदार यांच्या कानावर हा विषय का घातला जात नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपयाचा निधी दौंड च्या विकासासाठी आणणारे आमदार कुल हा विषय चटकन मिटवतील परंतु अधिकाऱ्यांची उदासनधीनता याला कारणीभूत आहे. अजून कुठपर्यंत भिगवण फिडरच्या वर अवलुबून राहायचे व अशी अवस्था करुन ग्यायची याचे उत्तर विद्युत वितरण कंपनीच देवू शकते


Translate »
error: Content is protected !!