ताज्या घडामोडीराजकीयसामाजिक

दौंड येथे रस्त्यासाठी महिलेचा संघर्ष, नगरपालिकेला समोर आंदोलन सुरु..!


🔥MK NEWS 36

दौंड येथे रस्त्यासाठी महिलेचा संघर्ष, नगरपालिकेला आंदोलन सुरु..!

कोमल सोनवणे
दौड, प्रतिनीधी

द्रौपदी सिताराम मोहिते

रा. बंब चाळ, फॉरेस्टजवळ, दौंड, जि. पुणे

दिनांक : १६/०७/२०२५

प्रति,

मा. मुख्याधिकारी सोा, दौंड नगरपरिषद, दौंड,

ता. दौंड, जि. पुणे.

विषय :- ६ वर्षापासून आजूबाजूच्या लोकांनी विनाकारण रस्ता अडविल्याबद्दल आणि माझ्या आईला न्याय मिळण्यासाठी.

अर्जदार :- श्रीमती रेखा संजय कदम

महोदय,

विनंती अर्ज करते की, मी द्रौपदी सिताराम मोहिते यांची मुलगी रेखा संजय कदम मी गेले ६ वर्षापासून माझी तक्रार नगरपालिका, तहसिलदार, पोलीस स्टेशन, एस.पी. ऑफिस पुणे, दौंड नगरपालिकेचे नगरेवक आणि इतर बरेचशे लोकांकडे मदत मागितली. पण यामधुन मला कोणीही मदत केली नाही. माझे सर्व कागदपत्रे ही कायदेशीर असताना व आमची जागा नोंदणीकृत खरेदी मालकीची असताना तसेच जागा एन.ए. झालेली असताना, वेळेवर पाणीपट्टी, घरप‌ट्टी भरत आलेलो आहोत. असे सर्व काही कायदेशीर बाबी असताना फक्त एक राजकारणी व्यक्ती यामध्ये हस्तक्षेप करत आहे आणि माझ्या आईला आणि मला त्रास देत आहे. रस्त्यासाठी न्याय मागता मागता माझी आई सन १६/४/२०२५ रोजी मरण पावली. पण तिला न्याय मिळाला नाही. ती हयात असताना ती शुगर, बी.पी., पॅरालेसिस अशा आजाराने ती त्रस्त होती म्हणून भी तिला न्याय मिळण्यासाठी याअगोदर तीन वेळा उपोषणाचे लेटर दिले आणि तीन महिन्यापूर्वी मी उपोषणाला नगरपालिकेत बसलेही होते. पण मला दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मला स्वतःहून माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘ताई तुम्ही घरी जा, मी तुम्हाला रस्ता मिळून देतो, मी त्या दिवशी मुख्याधिकारी यांचे ऐकले आणि मी तेथून उठले आणि थोड्या दिवसांनी माझी

 

आईचे निधन झाले. मग मी काही दिवसांनी नगरपालिकेत गेले व तेथील कर्मचाऱ्यांनी मला सांगितले की, सर येथे नाही आणि हे माझ्यासोबत असेच गेल्या सहा वर्षापासून घडत राहिले. जे पण मुख्याधिकारी येतात ते काही दिवसांनी निघून जातात. म्हणून मी आता शेवटचा निर्णय घेत आहे, माझ्या आईला न्याय मिळालाच पाहिजे म्हणून मल उपोषणाला बसणार आहे आणि मला न्याय मिळाला नाही तर मी नगरपालिकेतच आत्महत्या करणार आहे. यास नगरपालिका, तहलिसदार जबाबदार असणार आहेत. कारण तुम्हा लोकांना कायद्यानुसार काम करत आहे, हे समजायला पाहिजे. कारण माझ्या आईकडे सर्व कागदपत्रे कायदेशीर आहे त्यानुसार तिला न्यायपण मिळाला पाहिजे.

६ वर्षापासून नगरपालिकेने आमचे पाणी बंद केले. तरी पण ते आमच्याकडून पाणीपट्टी आकरत आहे. जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही तरी तुम्ही घरपट्टी कशी आकारत आहात. अशा प्रकारे तुम्ही माझ्या आईसोबत अन्याय केला आहे.

मी, रेखा संजय कदम मला पण हाय बी.पी. चा त्रास आहे, मी माझ्या आईला न्याय मिळवण्यासाठी नगरपालिका कार्यालयातच उपोषणास बसणार आहे आणि मीही एक विधवा असून माझी परिस्थिती गरीबीची आहे. त्यामुळे मी काही फ्लेक्स, बॅनर लावणार नाही. कारण माझी सर्व काही कम्प्लेट तुम्हांला माहिती आहे. माझ्याकडे सर्व कम्प्लेट केलेली कागदपत्रे असून, उपोषणाला बसण्यासाठी केलेले अर्ज पुराव्यासहीत आहे. पण आपण त्याचा काहीही विचार केला नाही.  त्यामुळे मी

नगरपालिके समोर उपोषन करणार आहे.

 


Translate »
error: Content is protected !!