सामाजिक

परतीच्या पावसाने बारामती झाली जलमय : रस्त्यावर पाणीच पाणी, नागरिकांचा संतापाची लाट


परतीच्या पावसाने बारामती.. रस्त्यावर पाणीच पाणी, नागरिकांचा संताप….

बारामती: परतीच्या पावसाने बारामती शहराला चांगलेच झोडपले आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर जलसंचय झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून, एमआयडीसी ते भिगवण रोड जलमय झाल्या आहेत.

विकासाच्या वाद्यांवर प्रश्नचिन्ह बारामती शहराच्या विकासाच्या दाव्यांवर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसामुळे पाणी साचण्याची समस्या वारंवार उभी राहत असताना, शहरातील जलनिःसारण यंत्रणा सक्षम नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक आणि पादचारी दोघांचेही हाल झाले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नाराजी व्यक्त केली असून, “विकासाचा वादा फक्त कागदावरच आहे का?” असा सवाल केला आहे.

पुन्हा सुधारणा अपेक्षित स्थानिक प्रशासनाने पावसामुळे झालेल्या समस्यांकडे लक्ष देऊन लवकरच उपाययोजना आवश्यकता आहे पण ते या गोष्टीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे  का ? तथापि, वारंवार येणाऱ्या या समस्यांवर ठोस उपाययोजना न केल्यास, नागरिकांचा संताप अधिक वाढेल, असे चित्र आहे.


Translate »
error: Content is protected !!