अमराईत दहशत: दहीहंडी सराव वादातून मारहाण..
MK NEWS 36/ प्रतिनिधी
दहीहंडीच्या सरावाला गैरहजेरीचा राग; आनंद नगर अमराईत घरात घुसून मारहाण व तोडफोड..

बारामती /प्रतिनिधी: अमराई येथील आनंद नगर भागात दहीहंडी सरावाला न आल्याचा राग मनात धरून तब्बल सात ते आठ जणांनी मिळून एकाला मारहाण केल्याची आणि घरातील वस्तूंची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, गजानन गायकवाड यांच्या घरात घुसून लोखंडी रॉड, काठ्या आदींच्या साहाय्याने मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर घरातील टीव्ही, फर्निचर, भांडी व इतर वस्तूंची हानी करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी आरोपींवर मारहाणी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे .



