दौंड नगरपालिकेत खळबळबळ; महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन करणाऱ्यावर गुन्हा दाखल
🔥MK NEWS36
दौंड नगरपालिकेत महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन; एकावर गुन्हा दाखल
दौंड:
दौंड नगरपरिषद कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गब्बर वाल्मीकी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही, रा. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दौंड नगरपालिकेत कार्यरत असलेल्या ३४ वर्षीय महिला अधिकाऱ्याने फिर्याद दिली आहे.
ही घटना २२ जून २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दौंड नगरपरिषद कार्यालयात घडली. आरोपी वाल्मीकी हा संबंधित महिला अधिकाऱ्याच्या सहकाऱ्यांच्या केबिनबाहेर उभा राहून अश्लील शिवीगाळ करत होता. तसेच त्याने आक्षेपार्ह हावभाव करून महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग होईल असे वर्तन केले. एवढ्यावरच न थांबता, “ती येथे कशी काम करते ते पाहून घेतो” आणि “येथे कोणी काम करायचे नाही” अशी धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या गंभीर प्रकारानंतर महिला अधिकाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार २३ जून रोजी सायंकाळी ६:३१ वाजता दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ७४, ७Dynamic, १२६, १३२, २२१, २२४, २९६, ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा (रजिस्टर क्रमांक ४३१/२०२६) नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्याचे दाखल अंमलदार पोलीस हवालदार पवार असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.




