सासवड कराटे चॅम्पियनशिपमध्ये दौंडची सरशी – विजेत्या खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव..!
🔥MK NEWS36
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंडच्या विद्यार्थ्यांचे सासवड ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट यश..!
सचिन आटोळे
दौंड – विशेष प्रतिनिधी
सासवड येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सासवड ओपन कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेत ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन, दौंडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करत घवघवीत यश मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. जिल्ह्यातून तब्बल 350 स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ओम मार्शल आर्टच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीमती आनंदी काकी जगताप, माजी नगरसेवक गणेश दादा जगताप व नगरसेविका स्मिताताई जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण समारंभास पुणे जिल्हा स्थायी समिती सदस्य माननीय दत्ता झुरंगे आणि विचारधन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोरे उपस्थित होते. स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन विजन मार्शल आर्ट्सचे अध्यक्ष राग जाधव यांनी केले.
🏅 स्पर्धेत चमकलेले विजेते विद्यार्थी..!
प्रथम क्रमांक प्राप्त:
शिवम साबळे, कुबेर बंब, कार्तिक सुतार, सोहम सुरेकर, निहाल वाल्मिकी, आयुष कुलकर्णी, राजवीर भोंडवे, वंश कांबळे
द्वितीय क्रमांक प्राप्त:
राजवीर जगदाळे, अक्षिता शितोळे, स्वराज जगताप, आदित्य संसारे
तृतीय क्रमांक प्राप्त:
राजवीर शिंदे, कृष्णा कुंभारे, अक्षय शितोळे
विजयी विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक मंगेश चव्हाण तसेच प्रशिक्षक नितीन चव्हाण, सनी वाल्मिकी, गौरव गवळी आणि कृष्णा नय्यर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.अधिकाऱ्यांकडून विजेत्यांना शुभेच्छा
दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जालिंदर अवारी सर, शांकी जैन सर, संदीप शेलार (चिप रेल्वे तिकीट निरीक्षक व नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी, दौंड), हनुमंत वाघ (रेल्वे तिकीट निरीक्षक), दौंड योगा अँड स्पोर्ट असोसिएशनच्या अध्यक्षा वर्षा चव्हाण तसेच ओम मार्शल आर्टचे संस्थापक महेश चव्हाण व उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
ओम मार्शल आर्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश दौंड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून पुढील स्पर्धांसाठीही विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.




