ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“रेणुका नगरच्या मेन केबलचा प्रश्न मार्गी; रहिवासी संघाच्या पाठपुराव्याला यश”


🔥MK NEWS36 

रेणुका नगर रहिवासी संघाच्या पाठपुराव्याला यश; मेन केबलचे काम पूर्ण

बारामती : प्रतिनिधी

रेणुका नगर परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने महावितरणकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नागरिकांची वीजपुरवठ्याची गरज लक्षात घेऊन महावितरणच्या वतीने रेणुका नगरमध्ये आवश्यक असलेली मेन केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

रेणुका नगर परिसरात मेन केबलची आवश्यकता असल्याने रहिवासी संघाच्या वतीने महावितरणकडे याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी योगेश महाडिक, असलम भाई तांबोळी, बाबूलाल शेख आणि विशाल जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

रहिवासी संघाच्या मागणीची दखल घेत महावितरणने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून रेणुका नगरमध्ये मेन केबल टाकण्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, रहिवासी संघाच्या पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या कामासाठी सहकार्य करणारे महावितरणचे कर्मचारी अमोल गावडे यांचे रेणुका नगर रहिवासी संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघाच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी भूमिका रहिवासी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने रेणुका नगर रहिवासी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.


Translate »
error: Content is protected !!