ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्यावर’ बंधन? कल्याण-डोंबिवलीत नॉनव्हेज विक्रीवर २४ तास फतवा”


MK NEWS 36/प्रतिनिधी

स्वातंत्र्य दिनी ‘स्वातंत्र्यावर’ बंधन? कल्याण-डोंबिवलीत नॉनव्हेज विक्रीवर २४ तास फतवा”

कल्याण डोंबिवली/प्रतिनिधी:
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी मांस विक्री आणि कत्तलखाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. हा बंद रात्री १२ वाजल्यापासून पुढील रात्री १२ वाजेपर्यंत म्हणजे २४ तास लागू राहणार आहे. या काळात शेळी, मेंढी, कोंबडी तसेच मोठ्या जनावरांचे कत्तलखाने व मांस विक्री केंद्रे सुरू ठेवणे पूर्णपणे बंदीस्त राहील.

परवाना विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी आदेशाची माहिती देत सांगितले की, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत “यांच्या बापाचे राज्य आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला. आव्हाड यांनी हा निर्णय लोकशाहीतील स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे म्हटले.

नागरिकांच्या प्रतिक्रिया:

“१५ ऑगस्टला एक दिवस मांस विक्री बंद ठेवण्यात काही हरकत नाही. हा दिवस देशभक्तीचा असतो, त्यामुळे परंपरेचा सन्मान होतो.” – एक नागरिक.

“स्वातंत्र्य दिनी आपल्यालाच स्वातंत्र्य नसेल तर हा उत्सव कसला? वैयक्तिक निवडीवर असे निर्बंध लादणे चुकीचे आहे.” – ज्येष्ठ नागरिक.

“महापालिकेने निर्णय घेण्यापूर्वी सर्वांचा सल्ला घ्यायला हवा होता; अचानक आदेशामुळे विक्रेत्यांचे नुकसान होते.” – स्थानिक व्यापारी.


Translate »
error: Content is protected !!