ताज्या घडामोडीसामाजिक

देलवडी तालुका दौंड येथील श्री नंदकुमार किसन भागवत यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेड (महाराष्ट्र) या सामाजिक संघटनेच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती


प्रतिनिधी दौंड: देलवडी तालुका दौंड येथील श्री नंदकुमार किसन भागवत यांची राष्ट्रीय फुले ब्रिगेड (महाराष्ट्र) या सामाजिक संघटनेच्या दौंड तालुका उपाध्यक्ष पदी सन २०२४-२०२५ या कालावधी करिता नियुक्ती करण्यात आली दौंड तालुक्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत तळागाळात पोहचवण्यासाठी काम करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले, त्यांची नियुक्ती मा. सचिन भुजबळ पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या संमतीने, मा. लक्ष्मण जाधव दौंड तालुका अध्यक्ष व अमोल भागवत पुणे जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या शिफारशी वरून मा. अनिल नेवसे पुणे जिल्हा प्रभारी यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!