ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत चोरट्यांचा थरार! एकाच रात्री 3 ते 4 घरांवर डल्ला, ग्रामपंचायत सदस्यही निशाण्यावर?


🔥MK NEWS36 

🔴 ब्रेकिंग: बारामतीत धाडसी दरोडा – ग्रामपंचायत सदस्यच असुरक्षित, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण!

बारामती तालुक्यातील गाडीखेल गावात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच वेळी तीन ते चार घरांमध्ये धाडसी चोरी केली. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सदस्याच्या घरालाच लक्ष्य करत चोरट्यांनी दोन तोळे सोने, ८४ हजारांची रोख रक्कम आणि चांदीच्या पट्ट्या असा मोठा ऐवज लंपास केला.

या घटनेत आणखी धक्कादायक बाब म्हणजे चोरीला विरोध केल्याने संबंधित सदस्याच्या मुलावर चोरट्यांनी थेट पायावर वार केला. त्यामुळे गावात भीतीचं सावट अधिक गडद झालं आहे.

याच परिसरातील इतर घरांमध्येही चोरट्यांनी मंगळसूत्रासह मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. एका रात्रीत सलग अनेक घरांमध्ये चोरी होणं म्हणजे चोरट्यांचा वाढता धाडस आणि पोलीस यंत्रणेवरील मोठा प्रश्नचिन्ह मानलं जात आहे.

ग्रामपंचायत सदस्यच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलीस प्रशासन नेमकं कुठे कमी पडतंय? गावांमध्ये गस्त वाढवली जातेय का? अशा अनेक प्रश्नांनी आता नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.


Translate »
error: Content is protected !!