ई-पेपरक्राईमब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसामाजिक

सातव चौकाजवळ रेल्वे रुळाच्या कडेला निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू; आत्महत्येची शक्यता?


🔥MK NEWS36 

बारामतीत निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा संशयास्पद मृत्यू; रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह आढळून खळबळ
बारामती (कसबा) :
मुंबई पोलीस दलातून निवृत्त झालेले पोलीस उपनिरीक्षक रमेश बनसोडे (सध्या रा. बारामती कसबा) यांचा आज संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून शहरात खळबळ उडाली आहे. सातव चौकातून महिला रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या रेल्वे पुलाजवळील रेल्वे ट्रॅकच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
प्राप्त माहितीनुसार मृतदेह मुंडके वेगळे व देह वेगळ्या अवस्थेत आढळून आला आहे. प्राथमिक माहितीप्रमाणे, रमेश बनसोडे हे दीर्घकाळ आजारपणाने त्रस्त होते व त्यातून कंटाळून त्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही सुसाइड नोट अथवा तक्रार आढळून आलेली नाही.


सदर घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, स्थानिक नागरिकांनी रेल्वे ट्रॅकजवळ मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, वरील सर्व माहिती ही अधिकृतरीत्या अद्याप पोलिसांनी जाहीर केलेली नसून, विश्वसनीय स्रोतांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर तपशील समोर येत आहे. अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
घटनेबाबत बारामती पोलीस पुढील तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Translate »
error: Content is protected !!